Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- शाळा, मंदिर, थिएटर उघडल्यामुळं मुंबईकरांच्या आशा पल्लवित
- लोकल ट्रेन सुरू करण्याची मुंबईकरांची मागणी
- दोन डोसची अट शिथील करण्याची मागणी
करोनाची तिसरी लाट ओसरली आहे. अपवाद वगळता करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईतही हा करोना संसर्गाचा दर आटोक्यात आहे. त्यामुळं राज्य सरकारनं ४ ऑक्टोबरपासून शाळा, ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळं आणि २२ ऑक्टोबरपासून थिएटर्स खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळं मुंबईकरांकडून आता लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे.
वाचा: ओबीसींचा इम्पिरिकल डेटा अडवणे हे ‘त्या’ दिशेनं पहिलं पाऊल; भुजबळांचा आरोप
सध्या कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र, लोकल ट्रेनवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांपैकी फारच कमी लोकांनी दोन डोस घेतले आहेत. त्यामुळं अजूनही अनेकांना लोकल प्रवास करता येत नाही. परिणामी कामाची ठिकाणं गाठताना त्यांची फरपट होत आहे. लोकल ट्रेन पूर्ण क्षमतेनं सुरू न झाल्यामुळं अजूनही अनेक कार्यालयं व आस्थापना बंद आहेत. त्याचा फटका चतुर्थ श्रेणी कामगारांना बसला आहे. त्यांचा रोजगारच हिरावला गेला आहे. लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरणाचा वेग मंद आहे, त्यामुळं ती अट पूर्ण करून लोकल प्रवास करण्यासाठी अनेकांना बरीच वाट पाहावी लागणार आहे. सरकारनं आता आणखी अंत पाहू नये, असं हातावर पोट असलेल्या लोकांचं म्हणणं आहे.
महिला अत्याचार: काँग्रेसकडून फडणवीसांची कोंडी; जुना व्हिडिओ केला शेअर
मुंबईतील अनेक बाजारांत आजही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अनेक ठिकाणी मास्क वापरले जात नाहीत. लोक सर्रास विनामास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. राजकीय लोकांचे गर्दीचे कार्यक्रम होत आहेत. असं असताना केवळ ट्रेनवर निर्बंध लादून गोरगरिबांना का त्रास दिला जात आहे, असा सवाल मुंबईकर करत आहेत.
वाचा: मोठी बातमी! परमबीर सिंह यांच्यासह २५ पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव