Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मतदार यादीतील नाव कसे तपासायचे
मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी इंटरनेटचीही गरज नाही. ही पद्धत तुमच्यासाठी खूप सोपी असू शकते. कारण हे करण्यासाठी तुम्हाला कोणतीही वेबसाईट उघडावी लागणार नाही. युजर्स मेसेज पाठवून मतदार यादीची माहिती मिळवू शकतात, असे निवडणूक आयोगाने स्वतः आपल्या वेबसाइटवर सांगितले आहे. ही माहिती तुम्ही ऑनलाइन पोर्टल्स आणि ॲप्सवरही मिळवू शकता.
1950 वर पाठवा एसएमएस
एसएमएसच्या मदतीनेही याबाबत माहिती मिळू शकते. तुम्हालाही याबाबत माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला 1950 वर एसएमएस पाठवावा लागेल. येथे तुम्हाला EPIC क्रमांक लिहून पाठवावा लागेल. उदाहरणार्थ, तुमचा EPIC क्रमांक ‘87654321’ असल्यास तुम्हाला मेसेज करावा लागेल – ECI 87654321.
ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड
तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास, तुम्ही ते क्षणार्धात डाउनलोड करू शकता. ई-व्होटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला मतदार सेवा पोर्टलवर जावे लागेल. अधिकृत साइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला EPIC डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला जाईल. EPIC क्रमांक भरल्यानंतर तुम्ही तो डाउनलोड करू शकाल. जेव्हा तुम्ही मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी जाल, तेव्हा OTP चा ऑप्शन देखील मिळेल. तुम्ही त्यांचा मतदानासाठी देखील वापर करू शकता.