Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्‍ज; मोठ्या संख्‍येने मतदान करण्‍याचे आवाहन

23

नांदेड दि. २५ :  अठराव्‍या लोकसभेसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून उद्या शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. आज दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व पोलींग पार्ट्या मतदान केंद्रावर सुखरुप पोहोचल्‍या आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील एकूण 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार असून २३ उमेदवार रिंगणात आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्‍येने आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आला आहे.

जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्‍हावाशियांना आवाहन करतांना आपल्‍या संदेशात जनतेने मोठ्या संख्‍येने मतदान केंद्रावर पोहोचावे, अशी विनंती केली आहे. मतदान केंद्रावर उन्‍हापासून बचावासाठी प्रतिक्षालय उभारण्‍यात आली असून पिण्‍याच्‍या पाण्‍यासह आवश्‍यकतेनुसार आरोग्‍य विषयक उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. गेल्‍या ७५ दिवसांपासून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी कार्यरत असून उद्या शुक्रवारची सुटी मतदानासाठीच उपयोगात आणा असेही त्‍यांनी आपल्‍या संदेशात म्‍हटले आहे. उद्या संनियंत्रण कक्षातून  जिल्‍ह्यातील सर्व यंत्रणेवर आपले लक्ष राहणार असून निर्भय होऊन आपला मताधिकार वापरण्‍याचे सांगितले आहे.

18 लक्ष 51 हजार मतदार

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (294409), नांदेड उत्तर (346886), नांदेड दक्षिण (308790), नायगाव (301299), देगलूर (303943), मुखेड (296516) असे एकूण 18 लक्ष 51 हजार 843 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये 9 लक्ष 55 हजार 84 पुरुष तर 8 लक्ष 96 हजार 617  महिला तर 142 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.

10 हजार 637 कर्मचारी कार्यरत

नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी 10 हजार 637 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष 2766, इतर मतदान अधिकारी 7921, क्षेत्रीय अधिकारी 242, याशिवाय मायक्रो ऑब्जर्वर 39, होम वोटींग करीता 50, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे.

7 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी

नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये पोलीस बंदोबस्‍तासाठी एक जिल्‍हा पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक, 12 पोलीस उपअधीक्षक, 245 अधिकारी, 4272 अंमलदार, 2500 होमगार्ड याशिवाय 6 सीआरपीएफ कंपन्‍या असा तगडा पोलीस बंदोबस्‍त लावण्‍यात आलेला आहे.

मोबाईल वापरावर बंदी

आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्राच्‍या परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. त्‍यामुळे मोबाईलशिवाय मतदान करावे. मतदार, निवडणूक कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रावर प्रतीक्षालय

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान करावे असे आवाहन करताना जिल्हा प्रशासनाने यावेळी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सावलीची व्यवस्था, रांगेविरहित मतदान, व्हीलचेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष व पाळणा घर, आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

महिला सखी केंद्र तयार

जिल्‍ह्यात 16 ठिकाणी महिला व्यवस्थापनातील मतदान केंद्र आहेत. ते आजच सायंकाळी मतदारांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज झाले आहे. यामध्‍ये भोकर येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नुतन इमारत, बारड येथील जिल्‍हा परिषद कन्‍या शाळा, उत्‍तर नांदेड मधील वसंत नगर येथील राजर्षी शाहु बालक मंदिर, नांदेड दक्षिण मधील धनेगाव येथील मधुबन महाराज हायस्‍कूल, नायगाव येथील कृषीउत्‍पन्‍न बाजार समिती, देगलूर येथील सावित्रीबाई हायस्‍कूल नवी इमारत, मुखेड येथील गुरुदेव विद्यामंदिर, गुजराती हायस्‍कूल वजिराबाद, नांदेड आदिंचा सहभाग आहे. दिव्यांगांसाठी विशेष अशा सहा मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. 100 टक्के युवक अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती असणारे 16 केंद्र आहेत. इको फ्रेंडली मतदान केंद्राची संख्या 6 आहे तर  5 शाडो मतदान केंद्र आहेत.

32 संवेदनशील केंद्र

जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांची यादी नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार 62 मतदान केंद्र असून त्यापैकी 32 मतदान केंद्र संवेदनशील केंद्र म्हणून घोषीत केली आहेत. 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात 5 केंद्र हे संवेदनशील आहेत. यामध्ये केंद्र क्रमांक 139 राजर्षी शाहू विद्यालय वसंतनगर, केंद्र क्रमांक 202 विवेक वर्धिनी हायस्कूल यशवंतनगर, केंद्र क्रमांक 205 नांदेड क्लब स्नेहनगर, केंद्र क्रमांक 241 शासकीय औद्योगिक पी.एस. हॉल नंबर 4, केंद्र क्रमांक 333 इस्लाहुल आलमी माध्यमिक बॉईज स्कूल, रुम नंबर 4, नांदेड दक्षिण मतदान संघात एकूण 10 केंद्र संवेदनशील आहेत. मध्ये 192- गांधी राष्ट्रीय हायस्कूल गाडीपुरा, 115- जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा वर्ग आठवी ब, 161- जिल्हा परिषद वाजेगाव उत्तरेकडील रुम, 234- जिल्हा परिषद हायस्कूल बळीरामपूर मतदान केंद्र रुम नंबर २, मतदान केंद्र २८९- जिल्हा परिषद सोनखेड, 295- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवडी बाजार, मतदान केंद्र 212- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौफाळा, मतदान केंद्र १३५- महानगरपालिका हॉस्पिटल करबला, 132- जिल्हा परिषद मतदान केंद्र गर्ल स्कूल गाडीपुरा, 310- जिल्हा परिषद मतदान केंद्र कारेगाव. लोहा विधान मतदार संघात ३ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 2, नंदगाव, 37- कांजाळा तांडा व मतदान केंद्र 321- कदमाची वाडी. नायगाव विधानसभा मतदारसंघात 6 केंद्र आहेत. यामध्ये मतदान केंद्र 3 काळगाव, 109- गोळेगाव, 110- गोळेगाव, 292- पिंपळगाव, 293- पिंपळगाव, 301- मांजराम वाडी, देगलूर मध्ये मतदान केंद्र 408- अंगणवाडी ईमारत पुंजारवाडी हे केंद्र संवेदनशील आहे. मुखेड मध्ये ७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये मतदान केंद्र 144 चांडोळा, 298- हसनाळ (पीएम), गोजेगाव येथे मतदान केंद्र क्रमांक 339, 340 व 341, मतदान केंद्र क्रमांक 34 व 35 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (नि) हे 16 नांदेड मतदार संघात 29 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.

०००

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.