Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone युजर्ससाठी Google मॅप आणणार नवीन फिचर Live Activities, लॉकस्क्रीनवर मिळेल रियल-टाइम नेविगेशन

33

Google कंपनी आपल्या iOS युजर्ससाठी नवीन ऍक्टीव्हीटी फीचर्सची टेस्टिंग करत आहे. लाइव्ह ॲक्टिव्हिटीज लॉक स्क्रीनवर Google ॲप्सवरद्वारे रिअल-टाइम माहिती देईल. हे फिचर Uber आणि Lyft सारख्या ॲप्समध्ये आधीपासूनच मिळत आहे. गुगल मॅपचे हे फीचर अँड्रॉईड यूजर्ससाठी आधीच उपलब्ध आहे. आता लवकरच आयफोन यूजर्सला देखील हे फीचर मिळणार आहे.

आयफोन युजर्सला एक नवीन आनंदाची बातमी मिळाली आहे. Google कंपनी आपल्या आपल्या नेव्हिगेशन ॲप Google मॅपवर वर iOS यूजर्ससाठी लाइव्ह ॲक्टिव्हिटीज फिचर्सची टेस्टिंग करत आहे. या फिचरच्या मदतीने मॅपवर जाण्यासाठी युजर्सला पुन्हा पुन्हा ॲप उघडण्याची गरज नाही.

Live Activities म्हणजे काय?

Live Activities लॉक स्क्रीनवर Google ॲप्सवरील रिअल-टाइम इन्फॉर्मेशन दाखवेल. हे फिचर Uber आणि Lyft सारख्या ॲप्समध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे, जे यूजरला पिकअप आणि ड्रॉपबद्दलची माहिती देते. आता आयफोन यूजर्सला लवकरच गुगल मॅपवर हे फीचर मिळणार आहे.
Google मॅपवर Live Activities वर हे फिचर
अँड्रॉइड युजर्ससाठी बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. आयफोन वापरकर्त्यांसाठी Google Maps वर हे फिचर उशिराने येत आहे.

Google आता काही निवडक iPhone मॉडेल्सवर Live Activities फिचरची चाचणी करत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स हे फीचर वापरण्याबाबत महत्त्वाची माहिती देत आहेत. ते लॉक स्क्रीनमध्ये नेव्हिगेशन पाहण्यास मदत करेल. अनेक युजर्सनी तर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फिचरच्या मदतीने वाहतूक व्यवस्थेला मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

हे फिचर कसे ऑन करावे

तुम्हाला हे फीचर वापरायचे असल्यास, तुम्हाला हे फीचर गुगल मॅप्स ॲपमधील सेटिंग्जमधून ऍक्टीव्ह करावे लागेल. सेटिंग्ज मेनूमध्ये, नेव्हिगेट करताना तुम्हाला Glanceable directions while navigating ऑन करावे लागेल. हे फिचर सध्या टेस्टिंग टप्प्यात आहे. अशा स्थितीत, लाइव्ह ॲक्टिव्हिटीज फीचर उपलब्ध होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

असे वापरता येईल हे फिचर

iOS 16 मधील खास डायनॅमिक आयलंड आणि लॉक स्क्रीनवर ही फीड बघायला मिळेल. ज्यास लाइव्ह ॲक्टिव्हिटी देखील म्हणतात. हे iPhonesच्या ऑलवेज ऑन डिस्प्लेवर दिसेल, ज्यामुळे युजर्सला रीअल-टाइम माहिती मिळेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.