Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फोनमधील जाहिराती ठरताय डोकेदुखी? आजच करा ही सेटिंग

10

जेव्हा तुम्ही फोन वापरता, गेम खेळता किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करता तेव्हा फोनवर अनेक जाहिराती दिसतात. या जाहिरातींमुळे सगळी मजा बिघडते. फोन वापरतांना इंटरनेटवरील जाहिरातींवर अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमचा फोन ॲड फ्री कसा करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या काही सेटिंग्ज बदलाव्या लागतील, त्यानंतर तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हिडीओ बघू शकतात.

Android व iOS युजर्स तुमच्या फोनमध्ये करा ही सेटिंग

• तुमच्या Android फोनमधील सेटिंग्जमध्ये जा आणि पर्सनल DNS शोधा.
• आता या ऑप्शनवर क्लिक करा.
• समोर आलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला DNS वर क्लिक करावे लागेल.
• आता येथे तुम्हाला तुमच्या DNS प्रोवाइडरचे होस्ट नेम लिहिण्यास सांगितले जाईल.
• यानंतर तुम्हाला dns.adguard.com वर क्लिक करावे लागेल.
• यानंतर तुम्हाला ते सेव्ह करावे लागेल.
• आता तुमच्या फोनमध्ये हे फिचर बघायला मिळेल

जाहिराती टाळण्यासाठी या करा सेटींग

  • वर देण्यात आलेल्या प्रोसेस नंतरही जाहिराती थांबत नसतीत, तर फोनच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर, येथे आपले Manage your google account या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर Personalized Ads वर जा. येथे तुम्हाला तुमच्या कोणत्या एक्टिविटीज ट्रॅक केल्या जात आहेत ते दिसेल
  • यानंतर तुम्हाला तुम्हाला सूट होत असलेल्या जाहिरातींचा पर्याय निवडता येईल
  • हे केल्यानंतर, Data & Privacy या पर्यायावर जा, त्यानंतर Personalized Ads वर क्लिक करा. गुगल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आणि शोधानुसार जाहिराती दाखवेल
  • Personalized Ads वर क्लिक केल्यानंतर My Ad Center या ऑप्शनवर जा. आता हा पर्याय बंद करा. यानंतर, Google वर जा आणि Delete Advertising ID वर क्लिक करा आणि ID डीलीट करा. यानंतर तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत

तुमच्या फोनमधील ॲड ब्लॉक सेटिंग पूर्णपणे झाली आहे की नाही हे तुम्ही तपासून घ्या यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये कोणतीही वेबसाइट उघडावी लागेल. यानंतर, जिथे जिथे जाहिराती दाखवल्या जातील तिथे ती जागा रिकामी दिसेल पण तुम्हाला YouTube किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिराती बघायला मिळतील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.