Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Philipsने लाँच केला सुरक्षा कॅमेरा, या Philips 5000 Series कॅमेऱ्याची किंमत व फिचर्स जाणून घ्या

11

hilips कंपनीने आपला रिक्युरीटी कॅमेरा लाँच केला आहे. कंपनीने तो CES 2024 मध्ये सादर केला. हा सिक्युरिटी कॅमेरा 2K दर्जाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. विशेष म्हणजे या कमेऱ्याला कोणत्याही वाय-फाय कनेक्टिव्हिटीची गरज नसते. त्यातील SD कार्डमध्ये फुटेजेस स्टोअर केल्या जातात व यानंतर या फुटेजेस ऍप्लिकेशन किंवा क्लाउडवर अपलोड केले करण्यात येऊ शकते.

Philips कंपेनियन या स्मार्टफोन ॲपच्या मदतीने हा कॅमेरा ऑपरेट केला जाऊ शकतो. यात नाईट व्हिजन हे फिचर देखील देण्यात आले आहे. या फिचरच्या मदतीने रात्रीच्या अंधारात देखील हा कॅमेरा ब्लॅक एंड व्हाईट स्वरूपात इमेज कॅप्चर शकतो.

Philips 5000 Series Indoor 360-Degreeची भारतातील किंमत

Philips 5000 Series Indoor 360-Degree Camera ची भारतात किंमत 8,895 रुपये आहे आहे. हा कॅमेरा फिलिप्स डोमेस्टिक अप्लायन्सेसच्या वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतो. शिवाय, तो Amazon वर खरेदीसाठी देखील उपलब्ध आहे. कॅमेरा सिंगल ब्लॅक शेड कलरमध्ये येतो.

Philips 5000 Series Indoor 360-डिग्री कॅमेऱ्याचे फिचर्स

Philips 5000 Series Indoor 360-डिग्री कॅमेरामध्ये 3-मेगापिक्सेल सेन्सर आहे. हे 2K म्हणजेच 2,304 x 1,296 पिक्सेल रिझोल्यूशनचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते. त्यामध्ये मायक्रोएसडी कार्ड टाकून, 24 x 7 मोडवर रेकॉर्डिंग करता येते. हा कॅमेरा 128 GB पर्यंत मेमरी कार्डला सपोर्ट करतो. तसेच, यात ऑफलाइन रेकॉर्डिंग देखील केले जाऊ शकते.

कॅमेरा फिलिप्स होम सेफ्टी ऍप्लिकेशनला सपोर्ट करतो. या ॲपद्वारे,युजर्स फुटेजेस व कॅमेराचे इतर फंक्शन्स कंट्रोल करू शकतात. यात टू-वे टॉक आणि सायरन फीचर देखील देण्यात आले आहे. यासह AI तंत्रज्ञानावर आधारित मोशन डिटेक्शन फीचर देखील मिळणार आहे. तर त्याचे डायमेन्शन 174mm х 158.5mm х 99mm आणि वजन 655g आहे. शिवाय ब्लॅक अँड व्हाइट नाईट व्हिजनला देखील हा कॅमेरा सपोर्ट करतो यासोबत कॅमेऱ्यातून 10 मीटर अंतरापर्यंत बघितले जावू शकते. सोबतच या कॅमेऱ्यात मायक्रोफोन, स्पीकर आणि सायरन देखील मिळणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.