Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कायमस्वरूपी कमी झाली Samsung Galaxy S23 FE ची किंमत; एकूण २० हजारांची सूट

12

सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप ‘गॅलेक्सी एस’ सीरिजमध्ये एफई लाइनअप गेली काही वर्ष सादर करत आहे. या लाइनअपमध्ये फ्लॅगशिप सीरिजचे फीचर्स मिळतात परंतु किंमत कमी असते म्हणून ग्राहक यावर तुटून पडतात. आता या एफई लाइनअपमधील Samsung Galaxy S23 FE च्या किंमतीत कंपनीनं मोठी कपात केली आहे. हा फोन आता १० हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.

Galaxy S23 FE ची किंमत याआधी फेब्रुवारीमध्ये देखील कमी करण्यात आली होती. तेव्हा ५ हजारांची कपात करण्यात आली होती. तर आता पुन्हा एकदा हा फोन नव्या किंमतीत विकला जात आहे. पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा फोन ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS) सपोर्ट असलेल्या जबरदस्त ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. आता याचा बेस व्हेरिएंट ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे आणि बँक किंवा एक्सचेंज ऑफरसह याची किंमत आणखी कमी होऊ शकते.

आधीच्या तुलनेत इतका स्वस्त झाला फोन

स्मार्टफोन कंपनीनं Samsung Galaxy S23 FE भारतात दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये सादर केला होता. आधी ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५९,९९९ रुपये ठेवण्यात आली होती. जो फेब्रुवारीमध्ये ५००० रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता आणि आता याची किंमत पुन्हा ५००० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा बेस व्हेरिएंट आता फक्त ४९,९९९ रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे.

तर ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत लाँचच्या वेळी ६९,९९९ रुपये होती. फेब्रुवारी आणि आताच्या प्राइस कट नंतर आता हा मॉडेल ५४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन मिंट, ग्रॅफाइट आणि पर्पल कलर्समध्ये विकत घेता येईल.

बँक ऑफर देखील मिळेल

Galaxy S23 FE खरेदी करताना HDFC बँकेच्या कार्डचा वापर केल्यास १०,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे एकूण डिस्काउंट २० हजार रुपये होईल. तसेच, बंडल ऑफर अंतगर्त सोबत Galaxy Watch 6 खरेदी केल्यास अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. ग्राहक एक्सचेंज ऑफरचा फायदा देखील घेऊ शकतात.

Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगच्या फॅन एडिशन स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट ऑफर करतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये एक्सिनॉस २२० प्रोसेसर देण्यात आला आहे आणि ८जीबी पर्यंत रॅमसह २५६GB पर्यंत स्टोरेज मिळते. बॅक पॅनलवर OIS सपोर्ट असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ५०एमपी प्रायमरी कॅमेरा, १२एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि तिसरा ८एमपीचा टेलीफोटो सेन्सर मिळतो. फ्रंटला १०एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. यातील ४५००एमएएचची बॅटरी २५वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.