Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अल्बिंदर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ‘ब्लिंकिटला आता कूलर मिळाला मिळाला आहे. आता तुम्हाला फक्त 10 मिनिटांत सिम्फनी एअर कूलर घरबसल्या ऑर्डर करता येईल. आज सकाळपासून आम्ही 13 कुलर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवले आहेत.
कोणकोणते कुलर्स मिळतील
Blinkitवर ग्राहकांना कुलर्सची संपूर्ण रेंज खरेदी करता येणार नाही. सध्या या प्लॅटफॉर्मवर केवळ २ कुलर्स उपलब्ध आहेत. त्यात ग्राहकांना तब्बल २२ टक्क्यांची सूट मिळणार आहे. या प्लॅटफॉर्मवर Symphony Ice Cube 27 पर्सनल एअर कूलर 5,791 रुपयांना उपलब्ध आहे.
तर तुम्ही Symphony Diet 12T पर्सनल एअर कूलर 5,789 रुपयांना खरेदी करू शकता. अनेक यूजरने आपल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे की, Blinkitने हे पाऊल उचलणे आवश्यक होते. पण कंपनी हे कुलर्स कसे डिलीव्हर करेल हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कुलर ही अवजड वस्तू असल्यामुळे बाईक किंवा स्कूटरला बांधून ते लोकांपर्यंत पोहोचवता येणार नाही. यासाठी वाहतूकची व्यवस्था करणे अवश्यक आहे. यामुळे सध्या मर्यादित शहरांमध्ये कंपनी ही सुविधा देत आहे.
कंपनी 10 मिनिटात करतेय Sony PS5 Slim डिलीव्हर
अलीकडेच कंपनीने Sony PS5 Slim सोबत पार्टनरशिप केली आहे. या अंतर्गत, कंपनी हे PS5 Lite निवडक शहरांमध्ये 10 मिनिटांत डिलीव्हर करत आहे. जरी कंपनी 10 मिनिटांत डिलिव्हरी करण्याचा दावा करत असली तरी अनेक वेळा असे दिसून आले आहे की डिलिव्हरी करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतोय.
कूलरबद्दल बोलायचे झाल्यास, सिम्फनी एअरकूलर ब्लिंकिटवर सर्व क्षेत्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. कंपनीने ही सेवा निवडक शहरांमध्ये जारी केली आहे. ब्लिंकिटची ही सेवा दिल्ली एनसीआर, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये उपलब्ध आहे.