Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रेडमी इंडियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्टमध्ये Note 13 Pro+ 5G वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन ३० एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पोस्ट मधील टीजरमध्ये या स्मार्टफोनचा बॅक पॅनल दिसत आहे. जो ब्लू कलरमध्ये आहे आणि वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात अर्जेंटीना फुटबॉल एसोसिएशनचा AFA लोगो आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स Note 13 Pro+ 5G सारखे असू शकतात.
या स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम व + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये, १२ जीबी रॅम व २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३३,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम व ५१२ जीबी मॉडेलची किंमत ३५,९९९ रुपये आहे. हा Fusion White, Fusion Purple आणि Fusion Black ब्लॅक कलर्स मध्ये उपलब्ध झाला आहे.
Redmi Pad SE
काही दिवसांपूर्वी Redmi Pad SE भारतात लाँच झाला आहे. या अँड्रॉइड टॅबलेटची किंमत १२,९९९ रुपयांपासून सुरु होते. Redmi Pad SE मध्ये ११ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीनं स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटचा वापर केला आहे. सोबत ८जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते. हा टॅब अँड्रॉइड १३ सह मीयुआय पॅड १४ वर चालतो.
Redmi Pad SE मध्ये सिंगल रियर कॅमेरा मिळतो. टॅबलेट ८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं ५ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. या फ्रंट कॅमेऱ्याचा वापर टॅबलेट अनलॉक करण्यासाठी करता येतो.
कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी पॅड एसई मध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ३.५मिमी हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ ५.० असे ऑप्शन मिळतात. तसेच व्हर्च्युअल अँबीएंट लाइट सेन्सर आणि अॅक्सेलेरोमीटर असे सेन्सर देखील आहेत. यातील ८०००एमएएचची बॅटरी १०वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.