Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Fastrackच्या बेस्ट सेलर स्मार्टवॉचवर मिळवा भरगोस डिस्काऊंट, 1300 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी
Limitless X2चे फिचर्स
फास्टट्रॅक स्मार्टवॉचमध्ये 1.91 इंचाचा अल्ट्राव्हीयू डिस्प्ले आहे. या वॉचमध्ये नेव्हिगेशनसाठी रोटेटींग क्राउन देखील देण्यात आला आहे. या वॉचमध्ये 60Hz रिफ्रेश रेट मिळेल. LCD डिस्प्ले व्यतिरिक्त, यात ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. लिमिटलेस X2 हे स्मार्टवॉच IP68 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स असणार आहे.
हेल्थ फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ब्लड ऑक्सिजन लेव्हल ट्रॅकिंग आणि स्ट्रेस मॉनिटरिंग सारखे फीचर्स देण्यात आल्या आहेत. शिवाय यात स्लीप ट्रॅकिंग आणि वुमन्स हेल्थ मॉनिटर यांसारखे फिचर्स देखील देण्यात आले आहेत. युजर्स हे स्मार्टवॉच 100+ क्लाउड बेस्ड वॉच फेससह ऍडजस्ट करू शकतात. याशिवाय 100+ स्पोर्ट्स मोड्सचा सपोर्टही यात उपलब्ध आहे.
AI व्हॉईस असिस्टंट आणि बिल्टइन गेम्ससह येणाऱ्या या स्मार्टवॉचची बॅटरी दिवसांपर्यंत टिकू शकते. फक्त 10 मिनिटांसाठी चार्ज केल्याने तुम्हाला संपूर्ण दिवसाची बॅटरी लाइफ मिळते.
Limitless X2ची स्मार्टवॉचची किंमत
Fastrack स्मार्टवॉचची मूळ किंमत Amazon वर 2,995 रुपये दाखवली गेली आहे पण फ्लॅट डिस्काउंटनंतर ती Rs 1,399 पर्यंत खरेदी करता येणार नआहे. 100 रुपयांच्या कूपन डिस्काउंटनंतर, त्याची किंमत 1,299 रुपयांपर्यंत येईल. लिमिटलेस X2 क्लासिक ब्लॅक, डीप ब्लू आणि टील रंगांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
बॉक्समध्ये काय मिळेल?
Fastrack कंपनीच्या या स्मार्टवॉचसह मॅग्नेटिक चार्जिंग केबल मिळणार आहे. तसेच, युजर्सला क्वीक स्टार्ट गाईड देखील मिळेल. शिवाय, बॉक्ससोबत वॉरंटी कार्ड मिळेल.
या स्मार्टवॉचची सर्वात खास गोष्ट म्हणजे यातील कॉलिंग फीचर इतरांपेक्षा वेगळे आहे. साधारणपणे, बाजारात उपलब्ध असलेल्या या रेंजमधील स्मार्टवॉचमध्ये, कॉलिंग फीचर चालू असताना, घड्याळ स्पीकर म्हणून काम करू लागते, म्हणजेच फोनवर कोणतेही संगीत किंवा व्हिडिओ वाजल्यावर ते वॉचमध्ये ऐकू येते, परंतु Fastrack Limitless FS2 च्या बाबतीत असे असणार नाही. यामध्ये मीडिया ऑडिओ बंद करून स्वतंत्रपणे ऑडिओ कॉल करण्याचा ऑप्शन मिळणार आहे..