Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
इंजिनियर्सच्या पगारापेक्षा महाग बेल्स, तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी आहे IPL मधल्या स्टंपची किंमत
आज आपण स्मार्ट विकेट आणि स्मार्ट बेल्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल की आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टंप आणि बेल्स मध्ये लाइट असते, स्पर्श होताच ही लाइट पेटू लागते. आज आपण या स्मार्ट स्टंप आणि स्मार्ट बेल्सची माहिती आणि किंमत जाणून घेणार आहोत.
स्मार्ट विकेट आणि बेल्स म्हणजे काय ?
काही वर्षांपुवी क्रिकेटमध्ये या स्मार्ट स्टंप आणि बेल्सचा वापर करण्यात आला. या स्टंप आणि बेल्स मध्ये LED लाइट्सचा वापर केला जातो, ज्यामुळे पंचाना निर्णय देण्यास सोपं जातं. तसेच स्टंप आउट झाल्यावर चमकणाऱ्या स्टंपमुळे एक वेगळी रंगत येते.
स्टंप्स मध्ये LED लाइट्स बसवल्या जातात ज्या कंपोजिट प्लास्टिक पासून बनवलेल्या असतात. या स्मार्ट बेल्स आणि स्मार्ट विकेट्सना पावर देण्यासाठी बॅटरीचा वापर केला जातो. सध्या तरी मधल्या स्टंपमध्ये एलईडी लाइट्स नसतात कारण त्यात स्टंप कॅमेरा असतो. परंतु दोन्ही बेल्स आणि उर्वरित दोन स्टंप मात्र या टेक्नॉलॉजीसह येतात.
स्टंप आणि बेल्स मागील टेक्नॉलॉजी
बेल्स म्हणजे स्टंप्स पासून दूर होताच यातील LED लाइट्स ऑन होतात. या सिस्टमला Zing Wicket सिस्टम देखील म्हटलं जातं. ही सिस्टम ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर Bronte Eckermann यांनी बनवली आहे. त्यांना ही कल्पना आपल्या मुलीसोबत क्रिकेट खेळताना आली. त्यांच्या मुलीच्या सेटमधील बेल्समध्ये LED लाइट्स बसवण्यात आल्या होत्या.
व्यावसायिक क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्मार्ट बेल्समध्ये मायक्रोप्रोसेसर देखील लावला जातो, ज्यामुळे या स्टंपपासून दूर जाताच LED लाइट्स ऑन होतात. या लाइट्स ०.०००१ सेकंदात ऑन होतात. या बेल्स तेव्हाच चमकतात जेव्हा यांचे दोन्ही टोक स्टंपवरून हटतात.
स्मार्ट स्टंप आणि स्मार्ट बेल्सची किंमत
सध्या सुरू असलेल्या आयपीएल मधील स्टंपची किंमत देखील आश्चर्यकारक आहे. या विकेटची किंमत सुमारे १० ते ३५ लाखांच्या घरात आहे, तर एलडी लाइट्स असलेल्या बेल्सची किंमत देखील भरपूर आहे. सुमारे ४० ते ५० हजारांच्या या बेल्स या प्रत्येक आयपीएलच्या सामन्यात जान टाकतात हे नक्कीच.