Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्टंप्सपासून तर टोपीपर्यंत, एक IPLचा सामना कव्हर करण्यासाठी असतात इतके कॅमेरे, जाणून घ्या

10

IPLचा १७वा हंगाम मध्यावर आला आहे. कुठलाही सामना बघतांना कॅमेरा यंत्रणांच्या माध्यमांतून तंत्रज्ञानाचाचे चमत्कारिक स्वरूप अनुभवायला मिळते. IPL2024 जगभरातील खेळाडू आपले दमदार खेळाचे कौशल्य दाखवतांना सध्याच्या हंगामात दिसत आहेत. या स्पर्धेदरम्यान दररोज कोट्यवधी लोक टीव्हीवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण बघत असतात. यावेळी स्क्रीनवर आपल्याला वेगवेगळ्या अँगलने सामना बघायला मिळतो. हे चित्रीकरण करणारे कॅमेरे कुठे आणि किती असतात तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया..

सामना कव्हर करण्यासाठी किती कॅमेरे वापरले जातात?

  • ऑउटसाइड ब्रॉडकास्टिंग स्टूडिओसाठी १
  • फिल्ड प्ले कवर करण्यासाठी १२ कॅमेरे
  • हॉक आय कॅमेरे ६
  • रन आऊट व्हिडीओ कॅप्चर करण्यासाठी ४ कॅमेरे
  • स्ट्राईक झोन कॅप्चर करण्यासाठी कॅमेरे २
  • स्टंप कॅमेरे ४
  • प्रोजेक्शन कॅमेरा १

कुठल्याही सामन्याचे थेट प्रेक्षेपण करण्यासाठी अनेक प्रकारचे कॅमेरे वापरले जातात. यूजरला एक उत्तम एक्सपीरियंस प्रोवाइड करण्यासाठी हे कॅमेरे वापरले जातात.

मेन कॅमेरा- हा प्रायमरी कॅमेरा असतो, स्टेडियममध्ये काही विशेष ठिकाणी सेट करण्यात येतात. या कॅमेऱ्यातून सामन्याचे नीट चित्रीकरण करण्यात येते

बाउंड्री कॅमेरा- तुम्ही हे कॅमेरे बाउंड्रीरेषेजवळ अनेकदा पाहिले असतील. हे कॅमेरे फिल्डर्सच्या क्लोज-अप शॉट्ससाठी वापरले जातात. त्यांच्या मदतीने, खेळाडूंच्या हालचालींच्या डिटेल्स बघायला मिळतात.

स्टंप कॅमेरा- हे स्टंपच्या मध्यभागी स्थापित केले जातात. हे गोलंदाज, फलंदाज आणि किपर संबंधित विशेष रेकॉर्डिंग करतात. त्यांच्या मदतीनेच आपण स्टंपजवळ स्लो मोशन रिप्ले पाहू शकतो.

स्पायडर कॅमेरा- हा कॅमेरा नावाप्रमाणेच काम करतो. हा कॅमेरा आकाशात उभ्या आणि आडव्या दोन्ही दिशेने वायर्सच्या साहाय्याने फिरू शकतो. या कॅमेऱ्यांमधून डायनॅमिक एरियल शॉट्स घेता येतात.

अल्ट्रा स्लो-मोशन कॅमेरा- हाय स्पीड कॅमेरे उच्च फ्रेम दराने कोणतीही हालचाल कॅप्चर करतात. त्यांच्या मदतीने, स्लो मोशन रिप्ले तपशील उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने दर्शकांना हळुवारपणे खेळातील दृश्य बघायला मिळतात.

हेल्मेट कॅमेरा- सामन्यात खेळाडू जे हेल्मेट कॅमेरे घालतात, त्यावर देखील कॅमेरा बसवण्यात येतो. यामुळे खेळाडूच्या दृष्टिकोनातून दृश्य दिसते.
रोबोटिक कॅमेरा- रिमोट कंट्रोल कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी बसवले जातात.

यासोबतच सामन्यात एकावेळी अनेक कॅमेरे वापरण्यात येतात. सामना सुरु असतांना प्रेक्षकांना टिपण्यासाठी देखील काही खास कॅमेरे असतात. दरवर्षी या कॅमेरा सिस्टिम व संख्येमध्ये वाढ होत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.