Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PDF फाईलवरील पासवर्ड काढून टाकायचाय? फॉलो करा या सोप्या स्टेप्स

11

अनेकदा बँकेकडून किंवा इतर महत्त्वाची कागदपत्र आपल्याला पासवर्ड प्रोटेक्टेड PDF फाइल्सच्या स्वरूपात मिळतात आणि जेव्हाही आपण ती उघडण्याचा प्रयत्न तेव्हा पुन्हा पुन्हा आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत जीच्या मदतीने तुम्ही Google Chrome, Android आणि iPhoneमध्ये PDF वरील पासवर्ड सहज काढू शकाल.

Android फोनमधील PDF पासवर्ड कसा काढायचा.

अँड्रॉईड फोनमधील पासवर्ड काढून टाकण्यासाठी, प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून पीडीएफ युटिलिटी ॲप डाउनलोड करावे लागेल. यानंतर तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

• ज्या फाईलचा पासवर्ड तुम्हाला काढायचा आहे ती पीडीएफ फाइल अगोदर डाउनलोड करा.
• पीडीएफ युटिलिटी ॲप उघडा आणि पीडीएफ निवडा आणि नेक्स्ट बटणावर टॅप करा.
• फाइल निवडल्यानंतर, स्टार्ट बटणवर टॅप करा
• यानंतर, तुमच्या स्क्रीनवर एक पॉपअप दिसेल ज्यामध्ये तुम्ही पासवर्ड टाका आणि ओके बटणावर क्लिक करा.
• तुम्हाला मूळ फाईलच्या पुढे पासवर्डशिवाय असलेली PDF फाइल दिसेल.

आयफोनमधील PDF फाईलचा पासवर्ड कसा काढायचा

तुम्ही iOS वर PDF वरून पासवर्ड हटवू शकता. यासाठी तुम्हाला PDF EXPERT हे ॲप डाउनलोड करावे लागेल. या ॲपमधील पासवर्ड रिमूव्हल फीचर पेड सबस्क्रिप्शनसह येते, पण तुम्हाला त्यात एक आठवड्याचे फ्री ट्रायल मिळते. त्याच्या मदतीने तुम्ही पीडीएफ फाइलमधील सर्व पासवर्ड काढू शकता. पासवर्ड काढण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

• सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये PDF expert ॲप डाउनलोड करा.

• त्यानंतर, मेनूवर जा आणि पीडीएफ फाइल शोधा ज्याचा पासवर्ड तुम्हाला काढायचा आहे.

• ओपन फाईलवर क्लिक करा आणि नंतर पीडीएफ फाइलचा पासवर्ड टाका आणि पीडीएफ उघडल्यानंतर, टॉप राइट कॉर्नरवर असलेल्या थ्री डॉट्सवर क्लिक करा.

• डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिमूव्ह पासवर्ड आणि चेंज पासवर्डचा ऑप्शन दिसेल. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऑप्शन निवडू शकता.

• यानंतर, जर तुम्ही पासवर्ड काढून टाकला असेल तर आता तुम्हाला या फाईलमध्ये पासवर्ड दिसणार नाही.

लॅपटॉप किंवा पीसीवरील Google क्रोमच्या मदतीने PDF पासवर्ड कसा काढायचा.

पीडीएफ मधून पासवर्ड काढण्यासाची एक अत्यंत सोपी पद्धत आहे. तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून पासवर्ड काढू शकता. तुम्ही तुमच्या मॅक किंवा विंडोजवर अशा पद्धतीने PDFवरील पासवर्ड काढू शकणार आहात

• सर्वप्रथम, ज्या PDF फाईलचा पासवर्ड तुम्हाला काढायचा आहे ती निवडा. ते Google Chrome मध्ये उघडा.
• जेव्हा तुम्ही Chrome मध्ये PDF फाइल उघडता, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पासवर्ड टाकून ती अनलॉक करावी लागेल.
• पासवर्ड टाकल्यानंतर तुमची PDF फाइल अनलॉक होईल. यानंतर तुमच्या कंप्यूटरवर प्रिंट कमांड द्या.
मॅक युजर्सना कमांड+पी करावे लागेल. विंडोज युजर्सला Ctrl + P दाबावे लागेल.
• त्यानंतर Save as PDF आणि Save वर क्लिक करा.
• सेव्ह केल्यानंतर, तुम्ही पासवर्डशिवाय PDF फाइल उघडण्यास तयार असाल.
• क्रोम व्यतिरिक्त, ही पद्धत सफारी, ऑपेरा आणि फायरफॉक्सवर देखील कार्य करते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.