Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मेस्सी आणि अर्जंटिना फॅन्ससाठी Redmi कडून खास भेट; Note 13 Pro+ 5G चा वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन लाँच

10

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Redmi नं भारतात Note 13 Pro+ 5G वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन लाँच केला आहे. हा Xiaomi नं अर्जंटिना फुटबॉल एसोसिएशन (AFA) सोबत मिळून सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर ड्युअल-टोन डिजाइन मिळते ज्यात ब्लू आणि व्हाइट स्ट्राइप्सचा समावेश करण्यात आला आहे. याच्या बॉक्समध्ये AFA ब्रँडिंग असलेल्या अ‍ॅक्सेसरीज देण्यात आली आहेत.

Redmi Note 13 Pro+ 5G वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशन मध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 7200 Ultra चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. याची ५,००० एमएएचची बॅटरी १२० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनच्या १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपये आहे. ही स्पेशल लाँच प्राइस आहे आणि ICICI बँकेच्या कार्डनं पेमेंट केल्यास ३,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. याचा अर्थ असा की या स्मार्टफोनची खरी किंमत ३७,९९९ रुपये आहे.

Xiaomi त्याचबरोबर ३,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. याची विक्री १५ मेपासून Amazon, Flipkart, Mi.com आणि शाओमीच्या रिटेल स्टोर्सवर होईल. Redmi Note 13 Pro+ च्या स्टँडर्ड मॉडेलच्या १२ जीबी रॅम व ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपये आहे. हा Fusion White, Fusion Purple आणि Fusion Black कलर्समध्ये उपलब्ध आहे.

शाओमीनं रेडमी नोट १३ प्रो प्लस 5जी वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशनसाठी Argentina Football Association सोबत भागेदारी केली आहे. हा स्पेशल एडिशन कंपनीनं देशात १० वर्ष पूर्ण केल्याचे औचित्य साधून बनवण्यात आला आहे. याचं रियर पॅनलवर जर्सी नंबर १० देखील आहे.

Redmi Note 13 Pro+ 5G World Champions Edition मध्ये AFA ची ब्रॅंडिंग देखील देण्यात आली आहे. खालच्या बाजूला ‘Campeon Mundial 22’ देखील लिहिण्यात आलं आहे. या सोबत एक एक्सक्ल्युजिव एक्सक्लूसिव बॉक्स आणि AFA ब्रॅंडिंग असलेल्या अ‍ॅक्सेसरीज मिळतात. या स्मार्टफोनमध्ये ब्लू कलरची चार्जिंग केबल आणि AFA लोगो असलेला अ‍ॅडेप्टर देण्यात आला आहे. तसेच सिम इजेक्टर देखील फुटबॉलच्या आकाराचा आहे आणि यावर देखील AFA लोगो आहे. हँडसेटमध्ये वॉलपेपर्स आणि स्पेशल आयकॉनसह एक कस्टमाइज्ड UI मिळतो.

Redmi Note 13 Pro+ 5G वर्ल्ड चॅम्पियन्स एडिशनचे इतर स्पेसिफिकेशन्स Redmi Note 13 Pro+ सारखेच आहेत. या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाची अ‍ॅमोलेड स्क्रीन १.५के रिजॉल्यूशन (१,२२० x २,७१२ पिक्सल) आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्ट्स प्रोटेक्शनसह मिळते. यातील ट्रिपल रियर कॅमेरा यूनिटमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.