Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
निवडणुकीतील उर्वरित टप्प्यांत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रय त्न करत आहेत. आपल्या सरकारच्या हॅटट्रिकसाठी मोदी आगामी काळात निवडणूक प्रचार आणखी तीव्र करणार आहेत. निर्धारित कार्यक्रमानुसार पंतप्रधान लवकरच गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक सभा आणि रोड शो करणार आहेत. झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशातही ते झंझावाती प्रचार सभा, रोड शो करतील.
मोदी यांना स्वतःच्या गुजरातकडे विशेष लक्ष देण्याची वेळ यंदा आली आहे. त्याचे कारण त्यांच्या सरकारमधील मंत्री व राजकोटमधील भाजप उमेदवार पुरुषोत्तम रूपाला यांचे वादग्रस्त वक्तव्य. रूपाला यांच्या वक्तव्याने संतापलेल्या क्षत्रिय व राजपूत समाजाचे मन वळवण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनीच येणे आवश्यक असल्याचा ‘फीडबॅक’ मिळाल्यावर मोदी स्व-राज्यात जाणार आहेत. यंदाचा हा रोष पाटीदार आंदोलनापेक्षा जास्त असल्याचे दिसत आहे. गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेशापर्यंत पसरलेले हे दोन्ही समाज रूपाला यांना माफ करण्याच्या मनस्थितीत नाहीत.
भाजपच्या अन्य नेत्यांनाही ‘प्रवेशबंदी’ करण्याचे लोण गुजरातभर गावोगावी पसरत चालल्याने, भाजप नेतृत्वासाठी ही नवीन डोकेदुखी ठरली आहे. अंतिमतः ‘आपल्या मोदींची प्रतिष्ठा’ आणि ‘जात’ यावर भाजपची मदार आहे. भाजपने आपल्या गुजरातमधील कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन तिथे क्षत्रिय समाजाला मोदींचा संदेश देण्याची जबाबदारी दिली. पण अनेक क्षत्रियबहुल गावांत त्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. ‘रूपाला यांच्याबद्दल तुमची नाराजी असू शकते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नसावी,’ असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. रूपाला यांच्या विधानानंतर, त्यांचे स्वत:चे राजकोटच नव्हे, तर अन्य लोकसभा जागांवरही भाजपसमोर काँग्रेसने चुरशीचे आव्हान उभे केले आहे.
पंतप्रधानांची प्रचारमोहीम
– आज बुधवार, १ मेपासून पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. बनासकांठा व साबरकांठा येथे जाहीर सभा. राजभवन, गांधीनगर येथे मुक्काम.
– गुरुवार, २ मे रोजी आणंद, सुरेंद्र नगर, जुनागढ, जामनगरमध्ये जाहीर सभा, पश्चिम बंगालमध्ये जाऊन कोलकाता येथील राजभवनात मुक्काम
– शुक्रवार, ३ मे रोजी वर्धमान, दुर्गापूर, कृष्णनगर, बोलपूर, सिंहभूममध्ये सभा, रांची येथील राजभवनात मुक्काम
– शनिवार, ४ मे रोजी पलामू, लोहरदगा आणि दरभंगा येथे जाहीर सभा, त्यानंतर संध्याकाळी साडेसहाला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये रोड शो