Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
three member ward system: त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे पक्षीय राजकारणाला बळ मिळणार; गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे मत
हायलाइट्स:
- त्रिसदस्यीय प्रभागपद्धतीमुळे पक्षीय राजकारणाला बळ येणार आहे- गृहराज्यमंत्री सतेज पाटील.
- त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये सर्वांना जुळवून घेता येते- सतेज पाटील.
- एखादा चांगला कार्यकर्ता असेल तर प्रभाग बदलल्याने त्याचे करिअरच संपून जात होते- सतेज पाटील.
पक्षीय पातळीवर प्रत्येक पक्ष आपली भूमिका घेत असतो. मात्र हा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला आहे. त्यानंतर पक्षाच्या पातळीवर अनेकांनी आक्षेप नोंदवले असले तरी त्या सगळ्यांना भेटून त्यांच्या मनात असलेल्या शंकेचे निरसन करण्यात येईल, असेही पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- उत्तर सोलापूर तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा; घरे पाण्यात, तर शेतीचे प्रचंड नुकसान
आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानक रद्द केल्याबद्धल विचारले असता सतेज पाटील म्हणाले, थोडी बाजू समजून घेतली पाहिजे. राजेश टोपे साहेब यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. एका वेळी अशा परीक्षा घेणे हे एक महाकष्टाचे काम असते. आणि म्हणून त्यामध्ये कुठे तरी अडचण येऊ नये अशी भूमिका आहे. कारण शेवटी लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात. ही परीक्षा पारदर्शकपणे व्हायला पाहिजे. एखाद्या तांत्रिक मुद्दा त्यामध्ये आला असेल आणि परीक्षा झाली असती तर मग प्रचंड गोंधळ झाला असता. पारदर्शकपणे मेरिटवरती परीक्षा व्हावी. कधी कुणावर अन्याय होऊ नये म्हणून टोपे यांनी तो निर्णय घेतलेला आहे.
क्लिक करा आणि वाचा- अजित पवारांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल; राऊत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा
मुलांना-मुलींना त्रास झाला त्याबद्दल निश्चितपणे आम्हाला दिलगिरी व्यक्त करायची आहे. परंतु त्यांच्या भवितव्यासाठीच हा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे आता जी परीक्षा होईल ते सर्व त्रुटी दूर करून व्यवस्थित होईल याची दक्षता महाविकास आघाडी सरकार घेत आहे. सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहेत. मागाच्यावेळी भरतीचा विषय आला. १३ लाख मुला-मुलींनी फक्त पोलिस भरतीसाठी अर्ज केले. ही पहिलीच परीक्षा महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. परीक्षा पारदर्शकपणे व्हावा या साठी आम्ही कटाक्षाने नियमाचे पालन व्हावे अशी अपेक्षा करतो, असेही गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय; येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार