Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone युजर्सला अलार्ममुळे येतेय उशिराने जाग, काय आहे प्रकरण जाणून घ्या

8

Apple कंपनीचे प्रॉडक्ट त्यांच्या उत्कृष्ट फिचर्ससाठी ओळखले जातात. पण आजकाल Appleच्या iPhone चे अलार्म फीचर सध्या युजर्सना त्रास देत आहे. आयफोन अलार्ममुळे लोकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत आहे. काही आयफोन यूजर्सनं अशी तक्रार केली आहे की त्यांनी फोनवर अलार्म सेट केला तरी अलार्म वाजत नाही. काही युजर्स सांगतात की अलार्म वाजतो, परंतु त्याचा आवाज खूप मंद आहे, ज्यामुळे अलार्मचा काही उपयोग होत नाही.

यावर Apple कंपनीने काय म्हणणे आहे?

सोशल मीडिया X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, वॉल स्ट्रीट जर्नलच्या जोआना स्टर्नने दावा केला आहे की अ‍ॅप्पलला या समस्येबद्दल कळले आहे. Apple ने विश्वास दिला आहे की ते या समस्येवर काम करत आहेत.

Apple युजर्स काय म्हणतात?

काही Apple युजर्स सोशल मीडियावर दावा करत आहेत की ही समस्या आयफोनमध्ये प्रदान केलेल्या अटेन्शन अवेअर ऍक्सेसिबिलिटी मुळे निर्माण झाली आहे. हे फिचर कमी आवाजासाठी डिझाइन केले आहे. याचा अर्थ, जेव्हा वापरकर्ता सतत आयफोनच्या स्क्रीनकडे पाहतो तेव्हा आवाज कमी होतो, मोबाईल जवळ असतांना हे फिचर नीट काम करत नाही. ज्यामुळे अलार्मचा आवाज कमी होत आहे. मात्र, अ‍ॅप्पलने या प्रकारच्या फीचरच्या समस्येबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

तुम्हालाही ही समस्या येत असल्यास, तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊ शकता, सेटिंग्ज > साउंड आणि हॅप्टिक्स मधील रिंगटोन आणि ॲलर्ट व्हॉल्यूम स्लाइडर हाय सेट करा. असे केल्यास तुमच्या फोनचा रिंगर चालू आहे किंवा बंद आहे याचा तुमच्या अलार्मवर कोणताही परिणाम होणार नाही, परंतु तुमच्या रिंगरच्या व्हॉल्यूम सेटिंग्जवर परिणाम होतो. तुमचा रिंगर कमी आवाजावर सेट केला असल्यास, तुमचा अलार्म मोठ्या आवाजात वाजणार नाही. Apple च्या सपोर्ट वेबसाइटनुसार, “तुम्ही तुमच्या रिंगरसाठी सेट केलेल्या आवाजाशी अलार्मचा जुळतोय का?.” तुमचा अलार्म आवाज योग्य नसल्यास, तुम्ही आवाजाचे बटण वर किंवा खाली करून ते ऍडजस्ट करू शकता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.