Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी केली अटक…
नाशिक (प्रतिनिधी) – सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर २४ तासांच्या आत शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी मयुर फान्सीस जॉन यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाणे येथे गुन्हा. रजि.नं. १२६/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२,३२३,५०४,१४३,१४९, १०८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.३०एप्रिल) रोजी रात्री २२:४५ वाजेच्या सुमारास कपुस्थळा गोदाघाट, नाशिक या ठिकाणी सनी जॉन हा त्याचे मित्र श्रेयस म्हस्के, सागर सोनवणे, अनिकेत सरोदे, रवि चव्हाण, अमोल चव्हाण यांचे सोबत बसलेला असतांना त्या ठिकाणी आरोपी योगेश साळी, दादु पेखळे, यश भागवत, मयुर पठाडे, गणेश शिरसाठ व इतर यांनी तत्कालीक भांडणाची कुरापत काढून दादु पेखळे व यश भागवत यांनी सनी जॉन यास शिवीगाळ, मारहाण करून, कोणत्यातरी धारदार हत्याराने त्याचे पोटावर, उजव्या पायावर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारून पळुन गेले. सदर संशयिता विरूध्द मयुर फान्सीस जॉन यांचे तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा. रजि.नं. १२६/२०२४ भा.दं.वि. कलम ३०२,३२३,५०४,१४३,१४९, १०८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर संवेदनशील गुन्हयाचे अनुषंगाने संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१, नितीन जाधव, सहा.पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयातील संशयित आरोपीताचा शोध घेऊन तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन गुन्हयातील संशयित आरोपीतांचा शोध घेण्याकरीता पंचवटी पोलीस स्टेशन कडील पथके स्वाना करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुधकर कड यांना तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे संशयित आरोपी मयुर राजेश पठाडे, रोहित उर्फ दादु सुधाकर पेखळे हे कोणार्क नगर परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली सदर परिसरात सपोनि. विलास पडोळकर, पोहवा. महेश नांदुर्डीकर, पोहवा. सागर कुलकर्णी, पोहवा. कैलास शिंदे, पोना. राकेश शिंदे, पोअं. कुणाल पचलोरे, पोअं. गोरक्ष साबळे, पोना अनिल मोरे, पोअं. घनश्याम महाले, पोअं. युवराज गायकवाड या पोलीस पथकाने सापळा रचुन संशयित आरोपीतांस ताब्यात घेऊन पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.
अशा प्रकारे सदरची उल्लेखनीय कामगिरी ही संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, वपोनि. मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील विलास पडोळकर, पोहवा. महेश नांदुर्डीकर, पोहवा. सागर कुलकर्णी, पोहवा. कैलास शिंदे, पोना. राकेश शिंदे पोअं. कुणाल पचलोरे, पोअं. गोरक्ष साबळे, पोना. अनिल मोरे, पोअं. घनश्याम महाले, पोअं. युवराज गायकवाड व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.