Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजकाल, लोक पैशांची गरज भासताच ऑनलाइन कर्ज घेणे पसंद करतात, खरेतर ऑनलाइन कर्जासाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. याशिवाय ऑनलाइन कर्जामध्ये कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. त्यामुळे लोक त्यांच्याकडे साहजिकच आकर्षित होतात. मात्र याच ऑनलाइन कर्जामुळे अनेकांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कर्ज प्रक्रिया करतांना लोक घाईघाईत कर्जाच्या अटी वाचायला विसरतात आणि नंतर पैसे परत करता करता त्यांच्या नाकी नऊ येतात. बाजारात अनेक लोन ॲप्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला काही मिनिटांत कर्ज देऊ शकतात. मात्र, त्यांच्याकडून कर्ज घेतल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.तुम्हीही ॲपवरून कर्ज घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला काही अशा खबरदारीबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही कर्ज प्रक्रियेदरम्यान घ्यायला हव्या .
1.लोन ॲप तपासणे महत्त्वाचे आहे
लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी, प्लॅटफॉर्मचे डीटेल रिसर्च करा आणि युजर्सचे रिव्ह्यूज देखील वाचा. संबंधित कर्जदाता RBI द्वारे नोंदणीकृत असल्याची खात्री करा. ॲपची वेबसाइट आणि सोशल मीडिया पेजेस पहा.
2. व्याज दर आणि शुल्क यांची तुलना करा
वेगवेगळ्या कर्ज ॲप्सद्वारे ऑफर केलेले व्याज दर आणि शुल्क यांची तुलना करा. फक्त सर्वात कमी व्याजदरासह कर्जाची निवड करू नका, तर सर्व शुल्कांचा देखील विचार करा.लपविलेल्या फीबद्दल जसे की प्रोसेसिंग फी आणि प्रीपेमेंट फी विचारा.
3. कर्जाच्या अटी काळजीपूर्वक वाचा
कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा. तुम्ही किती कर्ज घेत आहात, तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल आणि परतफेडीचा कालावधी काय आहे हे समजून घ्या. तुम्हाला काही समजत नसेल तर, कर्जदात्याला स्पष्टीकरणासाठी विचारा.
4. तुमच्या कर्ज परतफेडी क्षमतेचे मूल्यांकन करा
कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करा. तुमच्याकडे कर्जाची EMI परतफेड करण्यासाठी आवश्यक रक्कम असल्याची खात्री करा. तुमच्या खर्चाचे बजेट बनवा आणि त्यावर चिकटून रहा.
5. तुमची वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्या
कर्ज अर्जासाठी आवश्यक असलेली वैयक्तिक माहितीच शेअर करा. तुमच्या बँक खात्याचे तपशील किंवा OTP कोणाशीही शेअर करू नका. कर्ज ॲप सुरक्षित आहे आणि तुमची माहिती एन्क्रिप्ट करत असल्याची खात्री करा.