Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लहानपणी खाल्लेला मार जिव्हारी, शाळा विकत घेऊन थेट चालवलं बुलडोझर, कोण आहे हा अभिनेता?

9

वृत्तसंस्था, अंकारा (तुर्कस्तान) : काही क्षणांच्या स्मृती मनावर कायमच्या कोरलेल्या असतात. मग ते क्षण आनंदाचे, समाधानाचे असोत किंवा मग दु:खाचे, अपमानाचे. शाळेत शिक्षकांकडून खाल्लेला मार तुर्कीतील अभिनेता कॅगलर एर्टुगरुल याच्या प्रचंड जिव्हारी लागला. मोठे झाल्यावर ही शाळा कॅगलरने स्वत: खरेदी केली आणि ‘त्या’ अपमानाचा बदला म्हणून पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. कॅगलरच्या या कृत्याची जगभर चर्चा आहे. समाजमाध्यमांवर यावरून दोन गट पडले असून, काही जणांनी या कृतीवर जोरदार टीका केली असून, काही जणांनी त्याचे कृत्य योग्य असल्याचे म्हटले आहे.

कॅगरने नुकतीच आपली शाळा विकत घेऊन इमारत पाडली. या आठवड्यात, अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर सिमेंटच्या ढिगाऱ्याचे फोटो शेअर केले. शाळेची इमारत पाडल्यानंतरचा हा ढिगारा होता. ‘माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षक मला नेहमीच मारहाण करीत असत. म्हणून मी शाळा खरेदी केली आणि ती इमारतच पाडली,’ असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. एका विशिष्ट मानसिक स्थितीमध्ये येऊन मी हे कृत्य केले आहे, असेही तो म्हणतो.
TV कलाकारांमध्ये लगीनघाई सुरुच! ‘कन्यादान’ मालिकेतील आणखी एका अभिनेत्याने उरकलं लग्न
काही वेळातच हे फोटो ‘इंटरनेट’वर व्हायरल झाले आणि सोशल मीडिया यूजरनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी त्याच्या या कृत्यावर टीका केली, तर काहींनी त्याचे समर्थन केले. त्यापैकी एक म्हणाला, ‘कलाकार म्हणून तुमच्याबद्दल मला आदर आहे. तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे अनुभव वेगळे आहेत; पण तुम्ही शाळा आणि सर्व काही उद्ध्वस्त केले, ते नक्कीच चांगले नाही.’ या शाळेत अनेक पिढ्या शिकल्या, त्यांच्याबद्दल काय, असा सवाल आणखी एका यूजरने केला. काही जणांनी कॅगलरच्या या कृत्याचे ‘बंडखोरी,’ म्हणून समर्थन केले. ‘तू माझे स्वप्न जगला आहेस. तुला आणखी शक्ती मिळो,’ अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली. ‘मलाही माझ्या शाळेच्या बाबतीत असेच करायचे होते. माझे अनेक शिक्षक आपमतलबी होते,’ अशी प्रतिक्रिया आणखी एकाने नोंदवली.

कोण आहे कॅगलर?

कॅगलर हा एक तुर्की अभिनेता आहे. सन २०२० मध्ये ‘अफिल आस्क’मधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन बटरफ्लाय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय इतर काही मालिका आणि चित्रपटांत त्याने भूमिका केल्या आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.