Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
OnePlus Pad वरील ऑफर
वनप्लसचा सर्वात पहिला टॅबलेट मॉडेल OnePlus Pad सध्या सेलमध्ये शानदार डिस्काउंटसह खरेदी करता येईल. लाँचच्या वेळी याच्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३७,९९९ रुपये आणि १२जीबी रॅम व २५६जीबी मॉडेलची किंमत ३९,९९९ रुपये आहे.
अॅमेझॉन सेलमध्ये OnePlus Pad चा ८जीबी रॅम मॉडेल ३३,९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. यावर २रुपयांची कुपन ऑफर आहे, त्यामुळे याची किंमत ३१,९९९ रुपये होते. तर आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड नॉन ईएमआय ट्रँजॅक्शनवर ३००० रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल, ज्यामुळे याची प्रभावी किंमत २८,९९९ रुपये होते. म्हणजे दोन्ही ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा लाँच प्राइसवर ९,००० रुपयांची सूट मिळवू शकता.
तसेच दुसरीकडे, Flipkart Sale मध्ये देखील OnePlus Pad चा ८जीबी रॅम मॉडेल ३३,९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. एसबीआय बँक क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास ३५०० रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे याची प्रभावी किंमत ३०,४९९ रुपये होईल. म्हणजे हा अॅमेझॉनवरून खरेदी करण फायदेशीर ठरेल.
OnePlus Pad चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus Pad मध्ये मध्ये ११.६१ इंचाचा २के अॅमोलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. टॅबलेटसोबत बिल्ट इन ट्रॅकपॅड असलेला डिटॅच फोलियो देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये क्वॉड स्पीकर सिस्टम दिले आहे. जी डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी एटमॉसला सपोर्ट करतो. याशिवाय, वनप्लसने आपल्या पहिल्या टॅबलेट मध्ये स्टायलस सपोर्ट सुद्धा दिले आहे. टॅबलेट सोबत स्टायलस आणि चार्जर दोन्ही बॉक्स सोबत दिले आहे.
OnePlus Pad मीडियाटेक डायमेंसिटी 9000 प्रोसेसर सोबत येतो. यात १२ जीबी पर्यंत रॅम दिली आहे. याशिवाय, टॅबलेट मध्ये वनप्लसच्या दुसऱ्या डिव्हाइस सोबत डेटा शेअरिंग फीचर सुद्धा ऑफर केले जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्टँडर्ड वाय फाय हॉटस्पॉटच्या तुलनेत हे फीचर जास्त परिणामकारक आहे. टॅबलेटला पॉवर देण्यासाठी 9510mAh ची बॅटरी दिली आहे. जी 67W रॅपिड चार्जिंग सपोर्ट करते.