Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

corona latest updates करोना: राज्यात आज मृतांच्या संख्येत वाढ; मात्र, ‘हा’ दिलासाही!

38

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ८४४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ०२९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ६० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत नगण्य वाढ झाली असली, तरी आज करोना बाधित मृतांच्या सख्येत वाढ झाल्याने स्थिती चिंताजनक आहे. तर कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्याला हा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ८४४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ४३२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ८९५ इतकी होती. तर, आज ६० रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३२ इतकी होती. (maharashtra registered 2844 new cases in a day with 3029 patients recovered and 60 deaths today)

आज राज्यात झालेल्या ६० रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- भुजबळ-कांदे वादाला वेगळे वळण; छोटा राजन टोळीकडून धमकी आल्याचा कांदेंचा दावा

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येचा ग्राफ येतोय खाली

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ७९४ इतकी आहे. काल ही संख्या ३७ हजार ०३६ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार २६३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ००१ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ५३१ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ०७७ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार २७२ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ५७६ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! बीडच्या डॉक्टर तरुणीवर जळगाव येथिल परिचारकाकडून अत्याचार

मुंबईत उपचार घेत आहेत ५,०६३ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ०६३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६९८ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६६२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८१७ इतकी खाली आली आहे.

धुळे, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ३३०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या १०८ वर आली आहे. तर धुळे आणि भंडाऱ्यात सर्वात कमी, प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण आहेत.

क्लिक करा आणि वाचा- जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वीज पडून महिलेसह बालिकेचा मृत्यू

२,५४,९८५ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८४ लाख २९ हजार ८०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४४ हजार ६०६ (११.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५४ हजार ९८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.