Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ulefone Armor 26 Ultraची किंमत
Ulefone Armor 26 Ultra दोन मॉडेल्स मध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यात एक स्टँडर्ड मॉडेल आणि दुसरा वॉकी-टॉकी (Walkie-Talkie) व्हर्जन आहे. दोन्ही मॉडेल्सची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही. हे फोन्स १३ मे पासून AliExpressच्या माध्यमातून खरेदी करता येतील, किंमतही तेव्हाच समजेल अशी अपेक्षा आहे.
Ulefone Armor 26 Ultraचे स्पेसिफिकेशन्स
Ulefone Armor 26 Ultra मध्ये १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला ६.७८-इंच फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह लाँच झाला आहे. यातील स्पिकर्स १२१ डेसिबल इतका आवाज करू शकतात जो सामान्य होम थिएटरपेक्षा जास्त आहे.
Armor 26 Ultra रगेड फोन पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP68/IP69K सर्टिफाइड आहे आणि हा MIL-STD-810H सर्टिफाइड बिल्डसह देखील येतो, ज्याचा अर्थ असा आहे की हा शॉक आणि ड्रॉप्स देखील झेलू शकतो. हा मीडियाटेक डायमेन्सिटी ८०२० ५जी चिपसेटवर चालतो, सोबतीला १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून २टीबी पर्यंत वाढवता येते.
याच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एक २०० मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, एक ५० मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स, एक ६४ मेगापिक्सलचा इंफ्रारेड कॅमेरा आणि एक ३.२x ऑप्टिकल झूम असलेला टेलीफोटो कॅमेऱ्याचा समावेश आहे. फ्रंटला ५० मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
याच्या Walkie-Talkie मॉडेलमध्ये एक ड्युअल-मोड मोबाइल रेडियो सिस्टम आहे, जो डिजिटल आणि एनालॉग दोन्ही मोडला सपोर्ट करते. चांगल्या वॉकी-टॉकी अनुभवासाठी युजर UHF आणि VHF एंटेना मध्ये स्विच करू शकतात. या मॉडेलचे इतर स्पेसिफिकेशन्स स्टँडर्ड मॉडेल सारखे आहेत.
या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात 15600mAh बॅटरी आहे, जी १२० वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग, ३३वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की बॅटरी १,७५० स्टँडबाय टाइम आणि ५६ तास टॉकटाइम देऊ शकते.