Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मुंबईकरांचा प्रवास होणार सूकर
- वाहतूक कोंडीची समस्या सुटणार
- मेट्रोचे हे दोन मार्ग सुरू होणार
मुंबई मेट्रो ७ (रेड लाइन) म्हणजेच अंधेरी- पूर्व ते दहिसर आणि मेट्रो- २ अ (येलो लाइन) म्हणजेच डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका डिसेंबरपर्यंत प्रवासी वाहतूकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर मेट्रोच्या फेऱ्याची चाचणी सुरू आहे. ही चाचणीही अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच, मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
मुंबई मेट्रो प्रवासी वाहतूकीसाठी सुरू झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडींपासून मुंबईकरांना मुक्ती मिळणार आहे. डिसेंबर ते फेबुवारी दरम्यान या दोन मार्गावर मेट्रो सुरू होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणने (MMRDA)जाहीर केलं आहे. एमएमआरडीएचे आयुक्त एस श्रीनिवास यांनीही माहिती दिली आहे.
वाचाः आम्हीही यादी देऊ, ‘इडी’नं कारवाई करावी; जयंत पाटलांचे थेट आव्हान
मेट्रो लाईन २ए आणि लाइन ७ हे दोन्ही मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण आहेत, कारण यामुळे अंधेरी आणि दहिसर दरम्यान मेट्रो प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून त्यामुळे उपनगरीय लोकल गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाचे भुमिपूजन ऑक्टोबर २०१५ ला झाले होते तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर दोन्ही मेट्रो मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. करोनासंकटात मनुष्यबळाच्या अनुपलब्धतेपासून, कडक निर्बंधांचा परिणाम मेट्रो कामांवर होत होता. मात्र सर्व अडथळ्यांवर मात करून मेट्रो कामे वेगाने पूर्ण करण्यात आली.
वाचाः गोवा विधानसभेच्या २२ जागा शिवसेना लढवणार; संजय राऊतांची घोषणा
मेट्रो लाइन २ ए : दहिसर पूर्व ते डीएन नगरला जोडणाऱ्या १८.५ किमी लांबीच्या मेट्रो लाईन २ ए च्या बांधकामासाठी ६,४१० कोटी रुपये खर्च होत आहे. यात आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीरनगर, कामराजनगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूरनगर, गोरेगाव मेट्रो, आदर्शनगर, शास्त्रीनगर आणि डीएन नगर ही १६ स्थानके असतील.
मेट्रो लाइन ७ : अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडणारी १६.४७५ किमी लांबीची मेट्रो लाइन ७ ही ६.२०८ कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे. यामध्ये दहिसर (पूर्व). ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व) अशी १३ स्थानके असतील.