Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Apple Let Loose event: कुठे पाहता येईल लाइव्ह स्ट्रीम
अॅप्पलचा लेट लूज इव्हेंट आज संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल. या कार्यक्रमचं लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप्पलच्या ऑफिशियल वेबसाइट, अॅप्पल टीव्ही अॅप (Apple TV) आणि अधिकृत युट्युब चॅनेलवर बघता येईल.
नवीन iPad
मीडिया रिपोर्टमसूर, लेट लूज इव्हेंटमधून येणाऱ्या iPad आणि iPad Pro मध्ये OLED डिस्प्ले दिला जाईल. यांचा आकार अनुक्रमे ११ इंच आणि १२.९ इंच असेल. दोन्ही M3 ऐवजी M4 चिपसह सादर होऊ शकतात. दोन्ही मध्ये शानदार कॅमेऱ्यासह USB पोर्ट देखील मिळू शकतो. तसेच, आगामी आयपॅड लेटेस्ट iOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
Apple Pencil आणि कीबोर्ड
इव्हेंटमध्ये लाँच होणाऱ्या आयपॅड सह थर्ड जनरेशन अॅप्पल पेंसिलचा सपोर्ट दिला जाऊ शकतो, जी हॅप्टिक फीडबॅकसह येईल. त्याचबरोबर मॅजिक कीबोर्ड देखील येऊ शकतो. हा यूएसबी टाईप-सी पोर्टच्या माध्यमातून आयपॅडशी कनेक्ट करता येईल. यात मोठा ट्रॅकपॅड मिळेल.
मार्च मध्ये आला होता मॅकबुक एअर
अॅप्पलने यावर्षी मार्चमध्ये मॅकबुक एअर लाँच केला होता. हा लॅपटॉप दोन स्क्रीन साइज १३ आणि १५ इंच ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. याची पीक ब्राइटनेस ५०० निट्स आहे. यात एम३ चिप आणि १६ कोर Neural Engine देण्यात आला आहे. यात AI टेक्नॉलॉजीचा पोर्ट मिळतो.
चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी मॅकबुक एअर लॅपटॉपमध्ये WiFi-6E देण्यात आला आहे, जो जुन्या जनरेशनच्या वाय-फाय पेक्षा कित्येकपट फास्ट आहे. यात व्हॉइस आयसोलेशनसह Wide spectrum माइक देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी १०८०पी असलेला कॅमेरा मिळतो. यात Spatial Audio आणि Dolby Atmos देखील आहे, त्यामुळे शानदार साउंड मिळतो. याची किंमत १,०४,९०० रुपयांपासून सुरु होते.