Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयफोन तर कोणीही खरेदी करतं, फक्त खरे श्रीमंत घेऊ शकतात ‘हे’ ॲप्पल प्रोडक्ट

11

ॲप्पलचा Let Lose Event आज लाइव्ह होईल. या इव्हेंटमध्ये ॲप्पल ॲक्सेसरीज लाँच केल्या जातील. यांची किंमत लाखात असू शकते. ॲप्पल आज नवीन मॅजिक कीबोर्ड लाँच करू शकते. ज्यात अ‍ॅल्युमिनियम बेस आणि मोठा ट्रॅकपॅड दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर ॲप्पल पेन्सिल ३ आणि पेन्सिल प्रो लाँच केली काऊ शकते. या दोन्ही प्रोडक्टची किंमत १ लाख रुपये असू शकते. चला जाणून घेऊया ॲप्पलच्या अश्या हटके प्रोडक्टची किंमत.

ॲप्पल पॉलिशिंग क्लॉथ

ॲप्पल वेबसाइटनुसार, धूळ साफ करणाऱ्या कपड्याची किंमत १,९०० रुपये आहे. हा ॲप्पल २२४ रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी कारण्याची ऑफर देत आहे. हा क्लॉथ वर्ष २०२१ मध्ये आयफोन ६ आणि मॅक डिवाइससाठी बनवण्यात आला आहे.

प्रो डिस्प्ले स्टॅन्ड

हा ॲप्पल प्रो डिस्प्ले एक्सडीआर स्टॅन्ड आहे, जो एक मेटल स्टॅन्ड आहे. याची किंमत ९९९ डॉलर सुमारे ८३,४१८ रुपये आहे. हा ॲप्पलच्या लॅपटॉप आणि कम्प्युटर सोबत डिस्प्ले जोडण्याच्या कामी येतो.

मॅक प्रो व्हील्स

ॲप्पल मॅक प्रो कंप्यूटरसाठी आलेल्या चार व्हील्ससाठी तुम्हाला ७०० डॉलर म्हणजे सुमारे ५८,४४९ रुपये द्यावे लागतील. म्हणजे जर तुम्हाला मॅक प्रो कंप्यूटर एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जायचा असेल तर व्हील्स वापरता येतात.

मॅक प्रो फीट

ॲप्पलच्या मॅक प्रो फीटसाठी युजर्सना २९९ डॉलर म्हणजे सुमारे २५ हजार रुपये द्यावे लागतील. म्हणजे सामान्य स्टॅन्डच्या जागी फीट म्हणजे पाय लावण्यासाठी तुम्हाला इतके पैसे जमागे लागतील, ज्यात एक महागडा स्मार्टफोन येईल.

Thunderbolt केबल ३ मीटर

या चार्जिंग केबलची लांबी ३ मीटर आहे. परंतु यासाठी तुम्हाला १६० डॉलर म्हणजे १३ हजार रुपये द्यावे लागतील. ही एक एचडीएमआय थंडरबोल्ड केबल आहे. म्हणजे तुम्हाला चार्जिंगसाठी सुमारे १६० डॉलर खर्च करावे लागू शकतात.

मॅजिक कीबोर्ड

iPad Pro च्या १२.९ इंच मॉडेलच्या मॅजिक की-बोर्ड किंमत ३४९ रुपये सुमारे ३० हजार रुपये आहे. हा मॅजिक कीबोर्ड आयपॅडशी जोडला जातो. आणि तुम्हाला लॅपटॉप सारखा अनुभव मिळतो.

Apple Watch Hermes Band

ॲप्पल स्मार्टवॉचच्या बँडसाठी तुम्हाला ५३९ डॉलर म्हणजे सुमारे ४५ हजार रुपये खर्च करावे लागतील. सामान्य ग्राहक या किंमतीत डझनभर स्मार्टवॉच खरेदी करू शकतात.

Apple iPhone 15 FineWoven Case with MagSafe Mulberry

आयफोन १५ सीरीजच्या या कव्हरची किंमत सुमारे ५,९९९ रुपये आहे. या किंमतीत भारतात स्वस्त टच स्क्रीन स्मार्टफोन येतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.