Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lenovo Tab K11ची किंमत
Lenovo Tab K11 टॅबलेटचे दोन व्हेरिएंट्स भारतीयांच्या भेटीला आले आहेत. टॅबच्या ४जीबी रॅम व आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९० रुपये आहे. तसेच, याचा एक ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मॉडेल येतो, ज्याची किंमत १९,९९० रुपये आहे. या टॅबच्या खरेदीवर १ वर्षाचं Accidental Damage Protection आणि १ वर्षाची वॉरंटी मिळते.
Lenovo Tab K11 चे स्पेसिफिकेशन्स
Lenovo Tab K11 मध्ये ११ इंचाचा WUXGA डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ आहे. याला TÜV Rheinland Low Blue Light सर्टिफिकेशन मिळालं आहे. तसेच टॅब MediaTek Helio G88 प्रोसेसरसह आला आहे, त्याचबरोबर ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मिळते. टॅबमध्ये फोटोग्राफीसाठी १३एमपीचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ८एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हा टॅब अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. पाणी वाचवण्यासाठी यात आयपी५२ रेटिंग मिळते. ऑडियोसाठी यात क्वॉड स्पिकर्स आणि डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट मिळतो.
हा टॅब खासकरून बिजनेस आणि IT प्रोफेशनल्ससाठी सादर करण्यात आला आहे. यात अनेक अॅडव्हान्स फीचर्स व प्रीमियम अॅप्स आहे. लेनोवोच्या या टॅबमध्ये हाताने लिहिल्या नोट्स Text मध्ये रूपांतरित करण्यासाठी Nebo देण्यात आला आहे. तसेच यात MyScript Calculator देण्यात आला आहे, जो रियल टाइम Equations सोडवू शकतो. तसेच या लेनोवो टॅबमधील WPS डॉक्यूमेंट्स तयार करण्यास मदत करतो.