Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले आक्रमक.
- राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांना दिले आव्हान.
- कारखान्यावरील कर्जाबाबतचे आरोप फेटाळून लावले.
वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान
साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मदन भोसले यांनी कारखाना व्यवस्थापनाचे प्रमुख या नात्याने बाजू मांडत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. मदन भोसले म्हणाले, ‘सहा तालुक्यांतील ५४० गावांमध्ये किसनवीर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. ५२ हजार शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून मी निर्णय घेतलेले आहेत. किसनवीर कारखाना माझ्याकडे चालवायला आला तेव्हा कारखान्यावर १ लाख ६९ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. तरी देखील अतिशय कार्यक्षमपणे आम्ही कारखाना चालवला. कारखान्यावर मोठमोठे प्रकल्प उभे करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली. प्रतापगड सहकारी साखर कारखाना अडचणीत आला असताना शरद पवार यांच्या सूचनेनुसार हा कारखाना चालवायला घेतला. कारखान्याची अवस्था अतिशय नाजूक होती तरीदेखील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतला. दुष्काळी भागातील खंडाळा कारखाना देखील शेतकऱ्यांच्या मालकीचा हवा हे जाणून या कारखान्यात देखील आर्थिक गुंतवणूक केली. हे सर्व करत असताना माझा हेतु स्वच्छ होता. माझ्या मनात कोणतेही काळेबेरे कधीच नव्हते.’
वाचा: एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली ‘ही’ माहिती
मदन भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, त्यांचे बंधू नितीन पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. कारखान्याची निवडणूक घेऊन तो कारखाना आपल्या ताब्यात मिळत नाही म्हटल्यावर या मंडळींनी कारखान्याची बदनामी सुरू केली आहे. कारखाना चालावा म्हणून २८ हजार हेक्टरवर उसाची लागवड केली. त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे कर्ज उचलण्यात आले होते मात्र या कर्ज प्रकरणांमध्ये संबंधित शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना कोर्टात जायला त्यांनी भाग पाडलं. त्यातूनही आमचे संचालक मंडळ तावून-सुलाखून बाहेर पडले. निर्दोष मुक्तता झाली. आता माझ्यावरील वैयक्तिक द्वेषापोटी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम आमदार व त्यांचे सहकारी करत आहेत, असा आरोप करताना आमदारांनी विधानसभेत कर्तबगारी दाखवावी. तिथे काही दाखवता येत नाही म्हणून आमच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. सरकार त्यांचं असल्यामुळे चौकशीचा ससेमिरा आमच्याभोवती फिरवला जातोय. यातून विरोधकांना काहीही साध्य करता येणार नाही. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून आम्ही कारखाना चालवतोय. १५ ऑक्टोबर पूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देऊ आणि कारखान्याला गाळप परवाना मिळवू, असा विश्वास देखील मदन भोसले यांनी व्यक्त केला.
वाचा:‘आमचा दसरा कडवट केला, तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही’