Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल!
- सोमय्या यांच्या विधानाचा पाटलांनी घेतला समाचार.
- ईडीची नोटीस येण्याआधीच तुम्हाला कसं कळतं?
वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान
पाटील यांनी तीरकस शब्दांत सोमय्या यांची खिल्ली उडवली. ‘किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला हे कुणी सांगितलं?’, असा सवालच पाटील यांनी केला. ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं?, असा सवालही पाटील यांनी विचारला. पारनेर येथील मेळाव्यात पाटील बोलत होते.
वाचा: एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली ‘ही’ माहिती
महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू, असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे, असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले. केंद्रीय संस्थांचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सूडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही, मात्र भाजपकडून ऐनकेन प्रकारे असे राजकारण सुरू आहे असा आरोप पाटील यांनी केला.
मोदींनी लोकांना महागाईची सवय लावली!
पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे. मात्र आता महागाई बेसुमार वाढूनही यावर कोणी आंदोलन करत नाही. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना महागाईची एकप्रकारे सवयच लावली आहे. पक्षाच्या माध्यमातून हे विषय लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. मागील काही दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकरीच उरला नाही तर पाणी मिळून फायदा काय? म्हणून या अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करत, पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार नीलेश लंके यांनी करोना काळात न भूतो न भविष्यती असे काम केले आहे. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळे आज तरुण पिढीचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.
मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार नसतानाही…
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत तो मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार नाही तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही कारखान्यात पैसे जमा केले असतानाही मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे, असे नमूद करत पाटील यांनी ईडीच्या कारवाईवर साशंकता व्यक्त केली.
वाचा:भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले ‘हे’ आदेश