Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nokia 3210 आठवतोय का? पुन्हा नव्याने बाजारात आलाय आठवणीतला कीपॅड असलेला फोन

10

Nokia 3210 नं पुन्हा बाजारात पदापर्ण केलं आहे. नवीन फोन Nokia 3210 (2024) नावाने ग्राहकांच्या भेटीला आला आहे. २५ वर्षांनी पुनरागमन करत असलेल्या हा लोकप्रिय फीचर फोन यावेळी आकर्षक कलर्स मध्ये लाँच करण्यात आला आहे. HMD Global नं Nokia 3210 (2024) मध्ये २.४ इंचाची TFT LCD स्क्रीन दिली आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ब्लूटूथ ५.० ची कनेक्टिव्हिटी देखील मिळते. चला जाणून घेऊया याची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स.

Nokia 3210 (2024) ची किंमत

Nokia 3210 (2024) ची किंमत ८९ यूरो (जवळपास ८,००० रुपये) आहे. कंपनीनं हा जर्मनी, स्पेन, आणि युनायटेड किंग्डम सारखे मार्केट्समध्ये लाँच केला आहे. फोन लवकरच मध्य पूर्व, आफ्रिका आणि भारतात देखील सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. फोन Grunge Black, Y२K Gold, Subba Blue सारखे कलर्ससह लाँच करण्यात आला आहे.

Nokia 3210 (2024) चे स्पेसिफिकेशन्स

Nokia 3210 (2024) मध्ये २.४ इंचाचा TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात QVGA रिजॉल्यूशन देण्यात आलं आहे. फोनच्या मागे २ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो, सोबत एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी यात Unisoc T107 चिपसेट आहे. फोन एस३०+ सिस्टमवर ऑपरेट करतो. Nokia 3210 (2024) मध्ये ६४एमबी रॅम, आणि १२८एमबी स्टोरेज देण्यात आली आहे. ही मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं ३२जीबी पर्यंत वाढवता येते.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट आहे. यात ३.५मिमी हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे. बॅटरी आणि चार्जिंग पाहता, नोकियाचा हा फीचर फोन १,४५०एमएएचच्या बॅटरीसह आला आहे. कंपनीनुसार, हा ९.८ तासांचा टॉकटाइम देऊ शकतो. फोनमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात अनेक आणि फीचर्स मिळतात. फोनमध्ये एफएम रेडियो, एमपी३ प्लेयरचा सपोर्ट देखील आहे. त्याचबरोबर यात क्लासिक स्नेक गेम देखील टाकण्यात आला आहे. फोनमध्ये YouTube Shorts, News, Weather Updates अश्या क्लाउड अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.