Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ZTE Axon 60 आणि Axon 60 Liteची किंमत
ZTE Axon 60 ची किंमत ३,६९९ MXN (जवळपास १८,००० रुपये) आहे तर Axon 60 Lite स्मार्टफोनची किंमत २,९९९ MXN (जवळपास १४,५०० रुपये) आहे. हे Gold, Purple, Black, आणि Blue अश्या फोन चार कलर्स मध्ये आले आहेत. सध्या मेक्सिकोमध्ये लाँच झाले असून लवकरच इतर देशांमध्ये येऊ शकतात.
ZTE Axon 60 आणि Axon 60 Liteचे स्पेसिफिकेशन्स
वर सांगितल्याप्रमाणे, ZTE Axon 60 आणि 60 Lite ची डिजाइन iPhone सारखी वाटते. यात चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यात तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. फोन फ्लॅट फ्रेमसह येतात. पावर बटनला रेड कलर देण्यात आला आहे. पावर बटनमध्ये फोनचा फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
डिस्प्ले पाहता Axon 60 मध्ये ६.७२ इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तर Axon 60 Lite मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले आहे. यात एचडी प्लस रिजॉल्यूशन आहे आणि ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनमध्ये पंचहोल कटआउट मिळतो जो ॲप्पलच्या डायनॅमिक आयलँड प्रमाणे वापरता येतो. याला कंपनीनं ZTE Live Island असं म्हटलं आहे, जो नोटिफिकेशन, रिमायंडर तसेच इतर अनेक काम करतो.
ZTE Axon 60 मध्ये Unisoc T616 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे त्याचबरोबर ६ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज आहे. तर Axon 60 Lite मध्ये Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर ४ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आहे. फोन आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड १३ ओएससह येतो.
दोन्ही फोनच्या मागे ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, हा यांचा मेन कॅमेरा आहे. Axon 60 मध्ये मेन कॅमेऱ्यासह २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे आणि एक डेप्थ लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर लाइट मॉडेलमध्ये मेन कॅमेऱ्यासह २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे आणि एक AI युनिट आहे. यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. दोन्ही फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी २२.५वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.