Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – रामनगर, पुणे येथे हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण करणाऱ्या मुख्य आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करणेसाठी तिघांनी पिस्टलमधुन दोन राउंड हवेत गोळीबार केले व आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत लोकांना शिवीगाळ करुन परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर ते सर्व तेथुन पळुन गेले.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०८मे) रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी/ अंमलदार लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने पिंपरी भागात पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असतांना पोलिस अंमलदार सागर अवसरे व अजित सानप यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिटी प्राईड हॉटेल येथे एक इसम कमेरला पिस्टल सारखे हत्यार लावुन संशयितरित्या फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेवरुन गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी पोलिस उप निरीक्षक गणेश माने व स्टाफला सुचना मार्गदर्शन करुन सापळा लावुन कारवाईचे आदेश दिले. पोलिस पथकाने बातमीप्रमाणे हॉटेल सिटी प्राईड परीसरात सापळा लावुन शोध घेत असतांना संशयित इसम हा सिटी प्राईड हॉटेलचे ठिकाणी थांबला असलेला दिसुन आला त्याचवेळी त्याला पोलीस आल्याची चाहूल लागल्याने कमरेचे पिस्टल काढुन फायरिंग करण्याचे व उडी मारुन पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलिस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांनी त्यास झडप घालुन अत्यंत धाडसाने व शिताफीने पकडले. त्याचे कमरेला लावलेले पिस्टल व जिवंत राउंड काढुन घेतले. सदर इसमाचे नाव सिध्दाप्पा मलिकार्जुन यळसंगीकर (वय ३५) रा.यळसंगी, ता.आळंद, जि.गुलबर्गा, राज्य कर्नाटक सध्या राहणार सदगुरु हॉटेल कोथरुड डेपो पुणे असे आहे. त्याचेकडे मिळुन आलेल्या पिस्टलबाबत केलेल्या सखोल तपासामध्ये असे उघडकीस आले कि, (दि.७ मे) रोजी प्रणव सुपर मार्केट समोर रामनगर पुणे येथे लोकांमध्ये दहशत निर्माण करणेसाठी तिघांनी पिस्टलमधुन दोन राउंड हवेत गोळीबार केले व आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत लोकांना शिवीगाळ करुन परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर ते सर्व तेथुन पळुन गेले. गोळीबार करणारा सिध्दाप्पा यळसंगीकर हा मुळचा यळसंगी ता.आळंद, जि. गुलबर्गा राज्य कर्नाटक येथील असुन त्याचेवर सिंदगी पोलीस स्टेशन येथे दोन खुनाचे गुन्हे नोंद आहेत. सध्या तो जामीनावर सुटला असुन पुणे येथे कामासाठी आला आहे. सिध्दाप्पा यळसंगीकर याने त्याचे साथीदारांसमवेत दहशत निर्माण करणेसाठी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. सदर घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १९३/२०२४ आर्म ॲक्ट कलम ३ (२५) २७ (२), क्रि. लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७, भादवि कलम ३४ व मपोका कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गोळीबार करुन सिध्दाप्पा यळसंगीकर हा पिंपरी परिसरातुन येवून लपुन बसला होता. त्याचेबाबत विश्वासु बातमीदाराकरवी बातमी मिळवुन अत्यंत धाडसाने व शिताफीने पिस्टल व जिवंत राउंडसह ताब्यात घेवून पिंपरी पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार अजित आण्णा सानप यांनी सरकार तर्फे दिले फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सिध्दाप्पा यळसंगीकर याने पिस्टल व जिवंत राउंड कोठून आणले व कोणाच्या सांगणेवरुन फायरींग केले याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गणेश माने, सफौ शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, सागर अवसरे, नामदेव कापसे, आतिष कुडके, देवा राऊत, अजित सानप, शिवाजी मुंढे यांनी केली आहे.