Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Instagram Reel: चुकून डिलीट झाले इन्स्टाग्राम Reel? या नव्या फिचरचा वापर करून चुटकीसरशी करा रिकव्हर

13

भारतात सरकारने TikTok वर बंदी घातल्यापासून, Instagram वर रील्सचा ट्रेंड खूप वाढला आहे. तुमच्यासोबत कधीतरी असे घडले असेल की तुमच्या काही महत्त्वाच्या पोस्ट्स किंवा तुमच्या Instagram वरील काही महत्त्वाच्या रील्स डिलीट असतील. चुकून एखादी गोष्ट डिलीट झाल्यास टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही, चुकून डिलीट झालेली रील किंवा इंस्टाग्राम पोस्ट परत कशी रिकव्हर करावी प्रोसेस जाणून घेऊया

परंतु, येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही फक्त 30 दिवसांच्या आत पोस्ट किंवा इंस्टाग्राम रील रिकव्हर करू शकता. चला जाणून घेऊया रिकव्हर करण्याचा मार्ग काय आहे?

डीलिट झालेले इंस्टाग्राम रिल कसे रिकव्हर करावे?

सर्व प्रथम, आपल्या फोनमध्ये Instagram ॲप उघडा, Instagram ॲप उघडल्यानंतर, आपल्याला तळाशी उजव्या बाजूला दिसणाऱ्या आपल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करावे लागेल.

Instagram टिप्स

प्रोफाइल फोटोवर क्लिक केल्यानंतर, वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट्सच्या आयकॉनवर टॅप करा. तीन डॉट्सच्या आयकॉनवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला How You Use Instagram या ऑप्शनवर जावे लागेल.

How You Use Instagram या ऑप्शनमध्ये तुम्हाला Your Activity या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यांनंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय ओपन होतील.

फीडमधील कंटेंट डिलीट झाल्यास फायदेशीर ठरतील या टिप्स

तुम्हाला Removed and Archived Content सेक्शनमध्ये Recently Deleted ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. रिसेंट डिलीट ऑप्शनवर केल्यानंतर तुम्हाला अलीकडेच चुकून कोणतीही पोस्ट किंवा रील डिलीट केली असेल, ते तुम्ही येथून रिकव्हर करू शकणार आहात.

अलीकडील डिलीट पर्यायामध्ये, तुम्हाला दोन विभाग दिसतील, एक पोस्टसाठी आणि दुसरा रीलसाठी. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादी पोस्ट रिकव्हर करायची असेल, तर त्या पोस्टवर क्लिक करा आणि नंतर पोस्टच्या वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन पॉईंट्सवर क्लिक करा, तुम्हाला पोस्ट रिस्टोर करण्याचा पर्याय मिळेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.