Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तडीपार गुंडाकडून हिंजवडी पोलिसांनी जप्त केल्या बनावट चलनी नोटा, दुचाकी आणि…

8


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

तडीपार गुंडाकडून हिंजवडी पोलिसांनी जप्त केल्या बनावट चलनी नोटा, दुचाकी आणि…

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या तडीपार गुंडाची कसून चौकशी करत पोलिसांनी २८ हजारांच्या बनावट चलनी नोटा, १० दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त केल्या. अक्षय उर्फ सोन्या काळूराम हुलावळे (वय 29, रा. हुलावळे वस्ती, साखरे वस्ती, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १७५/२०२४ भा. द. वि. कलम ४८९ (अ) (ब) (क) (ड), ३४ मधील पाहिजे आरोपी असल्याने त्यास राम गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्हयात न्यायालयाचे आदेशान्वये वर्ग करून घेवून बनावट चलनी नोटांबाबत विश्वासात घेवून तपास करून त्याचेकडुन २८,०००/- रु. त्यामध्ये ५०० रु दराच्या ५६ बनावट चलनी नोटा हस्तगत केल्या.

या बाबत अधिक माहिती अशी की, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबविणेबाबत आदेशीत केले असल्याने (दि.०५मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ५ मे रोजी १८/०० वा.चे सु. तडीपार इसम नामे अक्षय ऊर्फ सोन्या काळुराम हुलावळे, (वय २९), रा.हुलावळे वस्ती, साखरे वस्ती, हिंजवडी, पुणे हा त्याचे ताब्यात कोयता बाळगताना मिळुन आला. त्याने पोलीस उप आयुक्त परि.२ पिं.चिं. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये काढलेल्या तडीपार आदेश क्र.३५/२०२३ चे अन्वये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्द व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षे (२४ महीने) करीता दि.२०नोव्हेंबर २०२३ पासुन हद्दपार केले असताना महाराष्ट्र शासन अगर पो.उ.आ.सो. परि.२ पिंचि. यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांचे आदेशाचे उल्लंघन करुन तो हिंजवडी पोलीस ठाणे हददीत मिळुन आला आहे. त्यामुळे त्याचेवर हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०८/२०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), मुंबई पोलीस अधिनियम १४२, ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल होवून त्यामध्ये त्यास अटक करण्यात आली.

सदर आरोपी हा हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १७५/२०२४ भा. द. वि. कलम ४८९ (अ) (ब) (क) (ड), ३४ मधील पाहिजे आरोपी असल्याने त्यास राम गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्हयात न्यायालयाचे आदेशान्वये वर्ग करून घेवून बनावट चलनी नोटांबाबत विश्वासात घेवून तपास करून त्याचेकडुन २८,०००/- रु त्यामध्ये ५०० रु दराच्या ५६ बनावट चलनी नोटा हस्तगत केल्या. सदरच्या बनावट नोटा या आरोपी १) अक्षय ऊर्फ सोन्या काळुराम हुलावळे २) अभिषेक राजेंद्र काकडे, (वय २०), रा.साखरे वस्ती रोड, हिंजवडी, ता.मुळशी, जि.पुणे मुळ रा.झिरपवाडी, ता.फलटण, जि.सातारा, ३) ओंकार रामकृष्ण टेकम, (वय १८), रा.साखरे वस्ती रोड, हिंजवडी, ता. मुळशी,जि.पुणे ४) विशाल ज्ञानेश्वर लहाने, (वय २०), रा.भुजबळ वस्ती, वाकड ब्रीज जवळ, वाकड, पुणे मुळ गाव रा.सेलु, ता.सेलु, जि.परभणी व १ विधीसंघर्षीत बालक यांनी मिळून वाई जि.सातारा येथे बनविल्या आहेत. आरोपी अभिषेक आणि विशाल यांना यापुर्वी अटक केली असुन त्यांचेकडुन बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, शाई, कागद व इतर साहित्य वाई जि. सातारा येथुन जप्त केले असुन हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा जेलमध्ये आहेत.

अशा प्रकारे सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि.२ पिंपरी चिंचवड, डॉ.विशाल हिरे, सहा.पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिंचिं. यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्याबापु देशमुख, ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास कैंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.