Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Jio चा नवीन प्लॅन
जिओच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या प्लॅनची किंमत ८८८ रुपये आहे. हा प्लॅन मंथली, सेमी-अॅन्युअल, क्वॉटरली आणि अॅन्युअल बेसिसवर विकत घेता येईल. या पॅकमध्ये 30Mbps चा स्पीड दिला जात आहे. तर जिओ एअर फायबर युजर्सना १०००जीबी आणि जिओ फायबर युजर्सना ३३००जीबी डेटा मिळेल.
जिओच्या या प्लॅनमध्ये १५ ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे. यात Netflix (Basic), Amazon Prime Lite, Disney+ Hotstar, Sony Liv, Zee५, JioCinema Premium, Sun NXT, Hoichoi, Discovery+, ALT Balaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, DocuBay, EPICON आणि ETV Win (Via JioTV+) चा समावेश आहे.
Jio चा नवीन प्लॅन खरेदी करण्यासाठी
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये जिओ अॅप ओपन करा.
- तुमचा जिओ नंबर टाका.
- त्यानंतर तुमच्याकडे ओटीपी येईल तो एंटर करून लॉग-इन करा.
- फायबर सेक्शनवर क्लिक करा.
- इथे तुम्हाला ८८८ रुपयांचा प्लॅन मिळेल.
- त्याची निवड करा
- त्यानंतर मंथली, सेमी-अॅन्युअल, क्वॉटरली आणि अॅन्युअल पैकी एक पर्याय निवडून पेमेंट करा.
- अशाप्रकारे तुम्ही प्लॅन खरेदी करू शकता.
- एप्रिल मध्ये लाँच झाला हा रिचार्ज प्लॅन
जिओनं यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीला २३४ रुपयांच्या प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. हा पॅक जिओ भारत फोन युजर्ससाठी रोलआउट करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची वाल्डीती दिली आहे. यात डेली ०.५जीबी डेटा (एकूण २८जीबी डेटा) मिळतो. तसेच, कॉलिंगसह मोफत JioSaavn आणि JioCinema चं सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.