Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lok Sabha: कोणी ५७०५ कोटींचं मालक, तर कोणाची ४५६८ कोटींची संपत्ती; चौथ्या टप्प्यात ४७६ उमेदवार कोट्यधीश
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, चौथ्या टप्प्यात भाजपच्या ७० उमेदवारांपैकी ६५ ते ९३ टक्के उमेदवार हे कोट्यधीश आहेत. तर काँग्रेसचे ५६ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेना (उबाठा), बीजेडी, आरजेडी, टीडीपी, भारत राष्ट्र समिती आणि शिवसेना यांनी जितके उमेदवार उभे केले आहेत, ते सर्व कोट्यधीश आहेत.
पश्चिम बंगालमधील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे ७ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर समाजवादी पक्षाच्या १९ उमेदवारांपैकी ११ अर्थात ५८ टक्के उमेदवारांनी त्यांची संपत्ती एक कोटीहून अधिक असल्याचं जाहीर केलं आहे.
चौथ्या टप्प्यात भाजप उमेदवारांची सरासरी संपत्ती १०१.७७ कोटी रुपये आहे, तर काँग्रेस उमेदवारांची सरासरी संपत्ती २३.६६ कोटी आहे. निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक उमेदवार (९२) उमेदवार उतरवणाऱ्या बहुजन समाज पार्टीकडे सर्वात कमी जाहीर करण्यात आलेली संपत्ती १.९४ कोटी रुपये आहे.
Sharad Pawar : व्यक्तिगत सोडाच राजकीय दृष्टीनेही कधीच मोदींसोबत जाणार नाही, मोदींची ती ऑफर पवारांनी धुडकावली
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात भाजपने ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यापैकी १० उमेदवारांकडे ५० कोटींहून अधिकची संपत्ती आहेत. पक्षाच्या जवळपास ४४.३ टक्के उमेदवारांनी १ कोटी ते १० कोटींपर्यंतची संपत्ती जाहीर केली आहे. केवळ ५ उमेदवारांकडे ५ कोटीहून कमी संपत्ती आहे.
काँग्रेसच्या ६१ उमेदवारांपैकी ७ जणांची संपत्ती ५० कोटींहून अधिक आहे. केवळ ८ टक्के उमेदवारांकडे एक कोटीहून कमी संपत्ती आहे. दुसरीकडे सपाच्या १९ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांची संपत्ती एक कोटी ते १० कोटींच्या दरम्यान आहे.
सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ५ उमेदवार
डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी – आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा जागेसाठी असलेले टीडीपी उमेदवार पेम्मासानी यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. ५७०५.५ कोटी संपत्तीचे ते मालक आहेत. तर त्यांच्यावर १०३८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. त्याच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे.
कोंडा विश्वेश्वर रेड्डी – तेलंगानातील चेवेल्लातील भाजप उमेदवार असलेले रेड्डी यांच्याकडे ४५६८ कोटी संपत्ती आहे. ते कोट्यधीश उमेदवारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यावर १३ कोटींहून अधिकचं कर्ज आहे. त्यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल आहेत.
प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी – आंध्र प्रदेशातील नेल्लोरमधून उमेदवार असलेल्या टीडीपी उमेदवाराची संपत्ती ७१६ कोटी रुपये आहे. तर त्यांच्यावर दोन कोटींचं कर्ज आहे. त्याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत.
अमृता रॉय – पश्चिम बंगालच्या कृष्णानगरमधून भाजप उमेदवार अमृता यांची ५५४ कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही.
सीएम रमेश – आंध्र प्रदेशातील अनाकापल्लेमधील भाजप उमेदवाराकडे ४९७ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. त्यांच्यावर १०१ कोटींचं कर्ज आहे. त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.