Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अवैधरित्या शस्त्रांची खरेदी-विक्री करणारे मुंब्रा पोलिसांचे ताब्यात…

8

पिस्टल, जिवंत काडतुसे खरेदी-विक्री करणाऱ्यांना मुंब्रा पोलिसांनी केली अटक…

ठाणे (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुक प्रकिया २०२४ कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये बेकायदेशीर शस्त्र व दारूगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त,  सहपोलिस आयुक्त ठाणे शहर व अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर यांनी वेळोवेळी आदेशीत केले आहे. त्या अनुषंगाने पोलिस उप आयुक्त परिमंडळ-१, सहाय्यक पोलिस आयुक्त, कळवा विभाग, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली अवैद्य रित्या अग्नीशस्त्रे व दारूगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करणेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिदे, मुंब्रा पोलिस स्टेशन, ठाणे यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या आहेत.

सदर आदेशाची अंमलबजावणी करत असताना (दि.०८मे) रोजी मुंब्रा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश कोरडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मुंब्रा रेतीबंदर परिसरात तिन इसम अवैदय अग्नीशस्व, काडतुसे गावठी पिस्टल चाकु चॉपर घेवुन विकीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. सदर बातमीचे अनुषंगाने वपोनि अनिल शिंदे यांचे मार्गर्दशनाखाली सपोनि उमेश कोरडे नेम- मुंब्रा पोलिस स्टेशन, ठाणे शहर यांनी व त्यांच्या पथकाने, अमृतनगर, शिवाजीनगर दर्गारोड मोकळे मैदानात मुंब्रा ता.जि. ठाणे येथे सापळा रचला असता सदर ठिकाणी तिन इसम आले त्यांना सदर पोलिस पथकाने पळुन जाण्याचा वाव न देता ताब्यात घेवुन त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता इसम नामे हमीद राजा ताजऊद्दीन शेख, उर्फ मोनु (वय २३ वर्षे), रा.नुरी अर्पाटमेंट रूम नंबर ८ दर्गा गल्ली मुंब्रा ता.जि. ठाणे याचे कमरेला लावलेले एक अग्नीशस्त्र व ट्रॅक पॅटचे उजवे खिशामध्ये तीन जिवंत काडतुस मिळुन आले अवैदयरित्या अग्नीशस्वासह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. तसेच इतर दोन इसम नामे रेहान अफसर शेख (वय २३ वर्षे) रा. एम. के टॉवर रूम नंबर ११ रषिद कम्पावुड कौसा मुंब्रा ता.जि ठाणे याचे कंबरेस एक चॉपर व इसम नामे रिजवान अफसर शेख उर्फ पचास उर्फ रिवान (वय २४ वर्षे), रा. एम के टॉवर रूम नंबर ११ रशिद कम्पातुंड कौसा मुंब्रा याचे कंवरेस एक खंजीर असे मिळून आले त्याचे जवळील एका बॅगमध्ये ०१ देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व सोबत ०३ जिवंत राउंड मिळुन आले. सदरचे देशी बनावटीचे एक अग्नीशस्व व तीन जिवंत काडतुसे, चॉपर व खजिरसह असा ५६,४००/- रू. कि. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हे पोलिस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेला मनाई आदेशाचा भंग करीत असताना मिळुन आल्याने त्याचेविरूध्द मुंब्रा पोलिस ठाणे गु.र. नं. १२८२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५. सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)१३५ प्रमाणे (दि.०८मे) रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान नमुद आरोपीस (दि.०८मे) रोजी अटक करण्यात आलेली असुन, न्यायालयाने त्यास १२ मे पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली असुन सदर आरोपीत यांचेवर यापुर्वी गंभिर गुन्हे दाखल आहेत सदर गुन्हयामध्ये ते पाहिजे आरोपी आहेत.

अशा प्रकारे सदर कारवाई ही पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे सहपोलिस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलिस आयुक्त,पश्चिम विभाग, विनायक देशमुख पोलीस उपयुक्त, परी १, सुभाषचंद्र बुरसे, सहापोलीस आयुक्त,कळवा विभाग उत्तम कोळेकर यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय दवणे, सपोनि उमेश कोरडे, पोहवा पाटील, पोहवा देसले, पोहवा गायकवाड, पोशि एडके, पोशि पाटोळे, पोशि महांगडे, पोशि सपकाळे यांनी केलेली असुन, गुन्हयाचा पुढील तपास सपोनि उमेश कोरडे हे करीत आहेत.

The post अवैधरित्या शस्त्रांची खरेदी-विक्री करणारे मुंब्रा पोलिसांचे ताब्यात… appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.

Leave A Reply

Your email address will not be published.