Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राजकारणातील ABC ते निवडणुकीतील गणितं शिकवली, जाणून घ्या बड्या नेत्यांचं आईसोबतचं नातं

11

नवी दिल्ली: आई ही आपली पहिली गुरु असते असं म्हणतात. एक आईच असते जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते, वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन करते. अनेक माता अशा आहेत, ज्या त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या बलिदानासाठी ओळखल्या जातात. राजकारणाचे क्षेत्र त्याहून काही वेगळे नसते. आज मदर्स डे साजरा करत असताना, भारतीय राजकारणी आणि त्यांच्या आई या माय-लेकांच्या नात्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

राहुल गांधी-सोनिया गांधी

rahul gandhi


सोनिया गांधींनी निवडणुकीतून निवृत्तीची घोषणा केली. ३ मे रोजी काँग्रेसचा बालेकिल्ला रायबरेली येथे राहुल गांधींनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्या त्यांच्या सोबत होत्या.

ज्याप्रमाणे राजीव गांधींना इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी म्हणून संबोधले जात होते. त्याचप्रमाणे राजीव गांधी यांचा मुलगा राहुल गांधीही काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा आणि आई सोनिया गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. राहुल आणि प्रियांका या दोघांचा त्यांच्या आई सोनिया गांधींशी असलेले प्रेमळ संबंध सर्वश्रूत आहेत. सोनिया गांधी या नेहमीच राहु गांधी यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. राहुल गांधींना जेव्हाही राजकारणात अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी मुलाची साथ दिली.

वसुंधरा राजे – विजया राजे सिंधिया

vasundhara raje1

भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी अनेकदा त्यांच्या राजकीय यशाचे श्रेय त्यांच्या आई विजया राजे सिंधिया यांना दिले आहे. आईला ‘गुरु’ म्हणत वसुंधरा राजे म्हणाल्या की, त्यांच्या आईने त्यांना राजकारणातील एबीसीडी शिकवली आहे. उल्लेखनीय म्हणजे, ‘राज माता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजया राजे सिंधिया यांनी भाजपच्या स्थापनेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि पक्षाला आर्थिक मदतही केली होती.

दुष्यंत सिंग – वसुंधरा राजे

vasundhara raje

गेल्या वर्षी २०१९ मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा वसुंधरा राजे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा दावा करू शकल्या नाही. त्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या गेल्या असल्या तरी त्यांचा मुलगा दुष्यंत सिंग यांना झालावाड-बारनसाठी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

तेजस्वी यादव – राबडी देवी

tejaswi yadav

भारतीय राजकारणी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, ज्या सध्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत, त्यांनी त्यांच्या राजकारणाचा वारसा त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवला आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी पती लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात जावे लागल्यानंतर राबडी देवी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती.

बन्सुरी स्वराज – सुषमा स्वराज

sushma swaraj

“मी सुषमा स्वराज यांच्या संस्कारांचा प्रतिबिंब आहे, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही,” बन्सुरी स्वराज यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रचारात पदार्पण करताना सांगितले. बन्सुरी यांनी त्यांना घडवण्यात तिच्या आईची मोठी भूमिका असल्याचं सांगितलं.

सचिन पायलट-रमा पायलट

Sachin pailot

काँग्रेसचे माजी नेते राजेश पायलट यांच्या निधनानंतर रमा पायलट यांनी १३ वी लोकसभा निवडणूक लढवली आणि पतीचा वारसा पुढे नेला. सचिन पायलट यांनी राजस्थानमधील दौसा येथून निवडणूक लढवणाऱ्या आपल्या आईला पाठिंबा देण्यासाठी राजकारणात प्रवेश केला होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.