Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ग्रुप न बनवता एकाच वेळी शेकडो लोकांना पाठवा WhatsApp मेसेज, फॉलो करा ही प्रोसेस

11

जगभरात कोट्यवधी लोक WhatsApp चा वापर करत आहेत. वापरण्यास सोपा असल्यामुळेच हा इन्स्टंट मेसेंजर जगप्रसिद्ध आहे. तसेच या अ‍ॅप वरून एकाच वेळी शेकडो लोकांना मेसेज पाठवता येतो, म्हणून देखील हे अ‍ॅप सर्रास वापरलं जातं. या फिचरचा वापर करून व्यक्ती, संस्था किंवा व्यवसायांना महत्वाच्या सूचना अनेकांपर्यंत सहज पोहोचवता येतात. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वरून एकाच वेळी शेकडो लोकांना मेसेज कसे पाठवायचे हे माहिती नसेल तर चला जाणून घेऊया.

कधी पाठवावे लागतात शेकडो लोकांना मेसेज?

समजा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर, पत्ता किंवा सोशल मीडिया अकाऊंट बदललं किंवा तुम्हाला बडे पार्टी, लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी मित्रपरिवार आणि नातेवाईकांना बोलायचं असेल अश्यावेळी एकच मेसेज अनेकांना पाठवायचा असतो. तुम्ही एक-एक करून देखील मेसेज करू शकता परंतु ब्रॉडकास्ट लिस्ट बनवल्यास हे काम अधिक सोपं होईल.

व्हॉट्सअ‍ॅप अनेकांना एकाच वेळी मेसेज मोफत कसे पाठवायचे?

एकाच वेळी शेकडो लोकांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुमच्या डिवाइसवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर होम स्क्रीनवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘New Broadcast’ ऑप्शनवर टॅप करा.
  • आता ज्या कॉन्टॅक्ट्सना मेसेज पाठवायचा आहे त्यांना सिलेक्ट करा. (तुम्ही २५६ कॉन्टॅक्ट निवडू शकता)
  • कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून झाल्यावर खालच्या बाजूला उजवीकडे असलेलया टिक आयकॉनवर क्लिक करून ब्रॉडकास्ट लिस्ट बनवा.
  • आता तुमची लिस्ट पूर्ण झाली आहे, या लिस्टमध्ये तुम्ही तुम्हाला हवा तो मेसेज पाठवू शकता. हा मेसेज मधील सर्व कॉन्टॅक्टसना जाईल.

नोट: ही पद्धत व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप बिजनेस दोन्ही अ‍ॅपवर वापरता येते.

ब्रॉडकास्ट मेसेज पाठवताना घ्या काळजी

तुमच्या कॉन्टॅक्टसचे वेगवेगळे गट करा. उदाहरणार्थ ऑफिस, कॉलेज, नातेवाईक इत्यादी. यामुळे तुम्ही प्रत्येक गटाशी संबंधित मेसेज तयार करू शकता आणि त्यामुळे मेसेज पर्सनल वाटेल सूचना नाही. मेसेज आटोपशीर असावा आणि त्यातून तुमचा उद्देश लगेच स्पष्ट होईल याची काळजी घ्या. तसेच ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये असलेल्या कॉन्टॅक्टसच्या कॉन्टॅक्टसमध्ये तुमचा नंबर सेव्ह असणं आवश्यक आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.