Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
सहा.पोलिस अधिक्षक,वरोरा नयोमी साटम यांचा आयपीएल सामन्यावर जुगार खेळणार्यावर छापा…
वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(१२) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी ,वरोरा यांना गोपनीय माहीती मिळाली की साई मंगल कार्यालयाचे बाजुला एक ईसम आयपीएल सामन्यावर बेटींग करतो अशा खात्रीशीर खबरेवरुन सहा.पोलिस अधिक्षक नयोमी साटम,पोलिस स्टेशन वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व पोलिस स्टाफसह, श्री. गुघाने यांचे घरी, बावने ले आउट, साई मंगल
कार्यालयाच्या बाजुला, वरोरा येथे आय. पी. एल. वर सटटा खेळणारे आरोपीवर रेड केली असता, तिथे एका खोली मध्ये १) ओमप्रकाश देविदास जाधव,२) आशिष गजानन जाधव, रा.वरोरा हे लॅपटॉप व मोबाईलच्या साहाय्याने, चिन्नास्वामी स्टेडीयम, बॅगलोर
येथील मैदानावर सुरु असलेल्या दिल्ली कॅपिटल विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या इंडीयन प्रिमीयर लिगच्या (आय.पी.एल.) लाईव्ह मॅचवर, पैशाची बाजी लावुन, व मोबाईलवरून, ग्राहकांकडुन मॅचचे सौदे घेउन, हारजितचा जुगार खेळ खेळीत (सट्टा लावतांना) असतांना मिळुन आले. वरून घटनास्थळावरून १० मोबाईल, ०१ लॅपटॉप, ०१ पेन ड्राईव्ह, ०२ कॅलक्युलेटर, एक ॲक्टीवा मोपेड, व इतर साहीत्य तसेच नगदी रक्कम ३२,७४० रू. असा एकुन ०२,६७,४१० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच त्या ठिकाणावर. यातील आरोपी नामे १) ओमप्रकाश देविदास जाधव, वय – ४३वर्ष, २) आशिष गजानन जाधव, वय-२७ वर्ष दोन्ही रा. सुभाष वार्ड, आशिर्वाद मंगल कार्यालय वरोरा, पाहीजे आरोपी ३) मिनाज शेख रा. वणी जि. यवतमाळ ४) जम्मु शेख रा.वणी जि.यवतमाळ ५) रितीक जाधव रा. वरोरा. ६) अमोल डांगरे रा.वरोरा ७) अमोल टिपले रा.वरोरा ८) बादल लाखा रा .वरोरा ९) भुषण दिक्षीत रा. वरोरा १०) डॉ. काळे रा.वरोरा ११) अजिंक्य नरडे रा. वरोरा १२) अमित घोडमारे रा. वरोरा १३) समीर पाटील रा.वरोरा १४) सुरज रा. बुटीबोरी नागपुर. १५) राजेश तुपकर रा. वरोरा १६) रवि गभणे रा.वरोरा १७) राहुल टिपले रा.वरोरा १८) पिंन्टु तडस रा.वरोरा १९) पिंन्टु टोंगे रा.वरोरा २०) प्रसाद खडसान रा. वरोरा २१) कुणाल चिमुरकर रा.वरोरा २२) मोहीत शर्मा रा.वरोरा २३) अनिल पाटील रा.वरोरा २४) पंकज वैद्य रा. वरोरा २५) अमित भगत रा.वरोरा २६) गौरव रा. वरोरा २७) रणजित रा. वरोरा २८) अतुल वानखेडे रा. वरोरा २९) मंगेश रा. भद्रावती ३०) मंगेश रा.वरोरा यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास सपोनि विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक, रिना जनबंधु,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा व्योमा साटम यांचे मार्गदर्शनाखाली,
सहायक पोलिस निरीक्षक विनोद जांभळे, पोशि दिपक दुधे,
दिपक मेश्राम, रिषभ काटकर, जितेंद्र राजुरकर, मोहन निषाद, राजु लोधी, विशाल राजुरकर, प्रशांत बावणे, चालक हेपट यांनी केली