Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

warrant against anil deshmukh मनी लाँडरिंग प्रकरण: अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोर्टाचे वॉरंट जारी

16

हायलाइट्स:

  • अनिल देशमुख चौकशीला हजर राहत नसल्याची ईडीची न्यायालयात तक्रार.
  • न्यायालयाने देशमुख यांच्याविरोधात केले वॉरंट जारी.
  • कोर्टाने देशमुख यांना १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे दिले आदेश.

मुंबई: मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर न झाल्याबद्दल न्यायालयाने आज शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम. नारळीकर यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान भारतीय दंड संहितेच्या कलम १७४ नुसार देशमुखविरुद्ध हे वॉरंट जारी केले. कोर्टाने देशमुख यांना १६ नोव्हेंबर या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Court issues process against Anil Deshmukh for non appearance before ED in money laundering case)

आरोपी आणि त्याच्या मुलीने किंवा त्याच्या वतीने वकीलाने ईडीचे समन्स स्वीकारल्याची वस्तुस्थिती पाहता, त्याच्यावर प्रथमदर्शनी खटला चालवला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- स्मृती मंधानाच्या शतकी खेळीने सांगलीत जल्लोष; झाली फटाक्यांची आतषबाजी

संचालनालयाने गेल्या आठवड्यात महानगर न्यायालयात अर्ज दाखल करून देशमुख यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १७४ (लोकसेवकाच्या आदेशाचे पालन न करणे) अंतर्गत कारवाई केली होती. अनेक वेळा समन्स देऊनही देशमुख मनी लाँडरिंगच्या प्रकरणांमध्ये ईडीसमोर हजर झाले नाहीत यामुळे कारवाई करण्याची मागणी केली होती.

क्लिक करा आणि वाचा- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?; अजित पवार म्हणाले..

या कलमाअंतर्गत शिक्षा एक महिन्यापर्यंत कारावास, किंवा ५०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीसह असू शकते.

देशमुख यांचे दोन सहकारी, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- यंदा नवरात्रोत्सवही साधेपणाने; महापालिकेची नियमावली जाहीर

या दोघांशिवाय, सचित वाझे यालाही या प्रकरणात नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात तपास यंत्रणेने आरोपी बनवले आहे. मात्र, आरोपपत्रात देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव आरोपी म्हणून देण्यात आलेले नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.