Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भयंकर! धावती बुलेट पेटली, आग विझवताना स्फोट; मदतीला धावलेले अक्षरश: उडाले, एकाचा मृत्यू

6

हैदराबाद: इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढलेली आहे. त्यामुळे अशा घटनांमध्येही वाढ झाली आहे. पण आता एका रॉयल एनफिल्ड बुलेटला आग लागल्याची घटना घडली आहे. चालत्या बुलेटनं पेट घेतल्यानं एकाचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. हैदराबादच्या भवानीपूरमध्ये ही घटना घडली.

भवानीपूर पोलीस स्थानक परिसरातील वोल्टा हॉटेलजवळ एका चालत्या बुलेटचा स्फोट झाला. अकबर फंक्शन हॉलजवळ बुलेटची इंधन टाकी फुटली. यामध्ये १० जण होरपळले. दुर्घटनेतील जखमींना प्रिन्सेस एसरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी पोहोचली. त्यांनी बुलेटला लागलेली आग विझवण्याचं काम सुरु केलं. घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

बुलेटला लागलेल्या आगीत १० जण गंभीररित्या भाजले. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती रॉयल एनफिल्ड बुलेटवरुन जात होता. बीबी बाजार परिसरात पोहोचताच त्याच्या बाईकला आग लागली. दुचाकीस्वारानं उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले.

दुचाकीजवळ पोलीस कर्मचाऱ्यासह दहा जण उपस्थित होते. ते पाईपनं दुचाकीवर पाणी टाकत होते. एकानं गोणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये बाईकला लागलेली आग स्पष्ट दिसत आहे. काही वेळ पेट घेतल्यानंतर बाईकचा स्फोट होतो. आसपास उभे असलेले सगळेच जण जीव वाचवण्यासाठी सैरापैरा पळू लागतात. स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही जण हवेत उडाले. ते काही फुटांवर जाऊन पडले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.