Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Realme GT 6T भारतात २२ मे २०२४ दुपारी १२ वाजता लाँच होईल. लाँच डेट व्यतिरिक्त ब्रँडनं फोनची इतर कोणतीही माहिती दिली नाही. Realme GT 6T च्या अॅमेझॉन इंडियावरील मायक्रोसाइटनुसार, फोनमध्ये Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट आहे आणि AnTuTu बेंचमार्कवर १.५ मिलियन पॉईंट्स मिळवले आहेत. या चिपवर थर्मल थ्रॉटलिंग कमी करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये एक मोठी व्हेपर वेपर चेंबर कूलिंग सिस्टम दिली जाईल. कंपनीनं इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही.
Realme GT 6T चे संभाव्य स्पेसिफिकेशन
Realme GT 6T मध्ये ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ असेल आणि यात ६,००० निट्स पीक ब्राइटनेस मिळेल. हा फोन स्नॅपड्रॅगन ७+ जेन ३ चिपसह बाजारात येईल, सोबत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि यूएफएस ४.० स्टोरेज दिली जाईल. १२८जीबी स्टोरेज मॉडेलमध्ये यूएफएस ३.१ स्टोरेज मिळेल.
कॅमेरा सेटअप पाहता फोनच्या मागे OIS सह सोनी आयएमएक्स८८२ ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. तसेच फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स६१५ सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. GT 6T मध्ये १००वॉट फास्ट चार्जिंगसह ५,५००एमएएचची मोठी बॅटरी देखील दिली जाऊ शकते. आशा आहे की २२ मेच्या लाँच पूर्वीच याचे स्पेसिफिकेशन्स समोर येतील. अलीकडेच Realme GT 6T ची किंमत देखील लीक झाली होती, त्यानुसार फोनची किंमत ३०,००० रुपयांपेक्षा कमी असू शकते. या बजेटमध्ये हा हँडसेट स्मार्टफोन वनप्लस, विवो आणि ओप्पो सारख्या हँडसेटना टक्कर देईल.