Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दारू विक्रेता गोवर्धन राजपूत येरवडा कारागृहात स्थानबद्ध…

8

दारू विक्रेता गोवर्धन राजपूत येरवडा कारागृहात स्थानबद्ध…


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

दारू विक्रेता गोवर्धन राजपूत येरवडा कारागृहात स्थानबद्ध…

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – स्वतः आणि आपल्या हस्तकांमार्फत दारू विक्री करत चिखली परिसरात दहशत निर्माण करून १६ ते २० वर्ष वयोगटातील मुलांना व्यसनाधीन करणाऱ्या गोवर्धन शाम राजपूत (वय ३२ वर्षे), रा.सोनवणे वस्ती, चिखली याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. त्याच्यावर सात गुन्हे दाखल असताना देखील तो न सुधारल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, उद्योग नगरी म्हणुन प्रसिद्ध असणा-या चिखली पोलिस स्टेशनचे हद्दीत परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विविध जाती धर्माचे लोक नोकरी निमीत्ताने या परीसरात वास्तव्यास आहेत. यामध्ये गरीब, कष्टकरी, नोकरदार, भंगार व्यावसायीक, व्यापारी असे विविध वर्गाचा समावेश यात आहे. दारिद्र रेषेखालील लोकांची संख्या जास्त असणा-या या परिसरात गोवर्धन शाम राजपुत, (वय-३२ वर्षे), रा.सोनवणे वस्ती अमेय कंपनीजवळ चिखली पुणे हा स्वतः तसेच आपले हस्तकांकरवी गावठी हातभट्टी दारूची विक्री करीत असे. वांरवार पोलीसांनी त्याच्यावर कारवाई करुनही जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. परीसरातील बेरोजगार तरुणाना हाताशी धरुन त्यांचे करवी या भागात त्याची दहशत निर्माण केलेली होती. त्याच्या हातभट्टीची दारु विक्री व्यवसायास कोणी विरोध केला किंवा पोलीसात तक्रार केली तर तो त्याचे साथिदारांकरवी त्यांना घातक शस्त्राने मारून जखमी करुन खलास करण्याची धमकी देत असे. कित्येक मजुर व्यसनाधिन झाल्यामुळे त्याच्या वर्तनामुळे सर्व सामान्य नागरीक त्रस्त, काही कर्ज बाजारी झाले. कित्येक गोरगरीब नागरीकांचे संसार उध्वस्त झाले. १६ ते २० वर्ष वयाची मुले त्याचे येथे दारु पिवुन वेगवेगळ्या गुन्हेगारी मार्गावर चालली होती. अनेक लहान मुले दारु पिण्यासाठी पैसे मिळविण्यासाठी छोटया मोठ्या चो-या करु लागले, त्याचेवर चिखली पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पुणे यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदया अंतर्गत एकूण ७ गुन्हे दाखल करुन कारवाई केलेली होती तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यास कायद्याचे भय राहिलेले नव्हते. त्याची दहशत मोडुन काढून त्याच्या गुन्हेगारी वृत्तीला कायमस्वरुपी पायबंध घालणे गरजेचे असल्याने चिखली पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी ठरवुन त्याचेविरुध्द एमपीडीए प्रस्ताव तयार करुन तो पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांना सादर केला. पोलिस आयुक्त यांनी सदर प्रस्तावाची गंभीरपणे दखल घेत रेकॉर्डवरील गुन्हेगार गोवर्धन शाम राजपुत यास स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले. त्यास ताब्यात घेऊन येरवडा कारगृहात स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. पोलिसांच्या कारवाईबद्दल परीसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परीमंडळ ३ डॅा शिवाजी पवार, सहापोलीस आयुक्त भोसरी विभाग, संदीप हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ  चिखली पोलिस स्टेशन यांचे अधिपत्याखाली पोउपनिरी राजेश मासाळ, पोहवा सचिन गायकवाड, मपोहवा दुर्गा केदार यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.