Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कलम १६७
रेल्वे कायद्याच्या कलम १६७ नुसार रेल्वेच्या डब्यात धूम्रपान करण्यास बंदी असूम सिगारेट, बिडी, चिलम किंवा यासारखे कोणत्याही प्रकारचे कोणत्याही पदार्थांचा समावेश असल्यास त्यावर कारवाई केली जाईल. तसेच ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्वलनशील पदार्थाचा वापर करण्यास ही मनाई करण्यात आली आहे. फक्त ट्रेनमध्येच नाही तर रेल्वे कार्यालय किंवा स्थानक परिसरात असे करणे दंडनीय गुन्हा असून पकडल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
यामुळे घेतला निर्णय
रेल्वेने प्रवास करताना प्रत्येक वयोगटातील लोक प्रवास करतात यात वृद्ध तसेच लहान मुलं याचा ही समावेश होतो. अशात अनेकदा काही प्रवासी धूम्रपान किवा मद्यपान करताना आढळतात जे इतर प्रवाशांसाठी अत्यंत हानिकराक ठरू शकते. त्यामुळे या समस्येची दखल घेत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
किती असणार दंड
या नियमानुसार ट्रेनमध्ये कोणताही प्रवासी बिडी किंवा सिगारेट ओढताना दिसल्यास तुम्ही ट्रेन कॅप्टन किंवा तिकीट कलेक्टरकडे तक्रार करू शकता. तसेच रेल्वेचा हेल्पलाईन क्रमांक १३९ याचाही वापर करून माहिती देऊ शकता. ट्रेनमध्ये धूम्रपान करताना पकडले गेल्यास तुम्हाला रेल्वे ॲक्ट अंतर्गत दंड ठोठावला जाऊ शकतो. हा दंड १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत असू शकतो. विशेष म्हणजे दंडाची रक्कम वाढविण्याचाही विचार सुरू आहे. धूरमुक्त वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. तसेच रेल्वे स्थानकांवर नो स्मोकिंग झोन निश्चित करण्यात आले आहेत. प्रवाशांनी धूम्रपान करू नये, यासाठी प्रचार साहित्याचे ही वाटप केले जाते.