Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयफोनपेक्षा जास्त वॉटरप्रूफ आहे ‘या’ कंपनीचा फोन; नेटवर्क-वायफायविना पण पाठवू शकतो मेसेज

11

Vivo नं Vivo X100 सीरीजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत, ज्यात Vivo X100 Ultra फ्लॅगशिप मॉडेलचा समावेश देखील करण्यात आला आहे. X100 Ultra मध्ये 6.78 इंचाचा कर्व्ड E7 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 200 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 5,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच IP69 रेटिंग आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी अश्या जबरदस्त फीचर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Vivo X100 Ultra ची किंमत

Vivo x100 Ultra च्या 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 6,499 चायनीज युआन (जवळपास 74,991 रुपये), 16GB+512GB व्हेरिएंटची किंमत 7,299 चायनीज युआन (जवळपास 84,261 रुपये) आणि 16GB+1TB व्हेरिएंटची किंमत 7,999 चायनीज युआन (जवळपास 92,278 रुपये) आहे. हा स्मार्टफोन टायटेनियम, व्हाइट आणि स्पेस ग्रे कलर्स मध्ये उपलब्ध आहे.

Vivo X100 Ultra चे स्पेसिफिकेशन

Vivo X100 Ultra मध्ये 6.78 इंचाचा कर्व्ड E7 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 3200 × 1440 पिक्सल, 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट आहे. सिक्योरिटीसाठी फोन अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनरसह आला आहे. X100 Ultra मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16GB RAM आणि 1TB इनबिल्ट स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 आधारित OriginOS 4 वर चालतो.

Vivo X100 Ultra मध्ये ट्रिपल Zeiss-ब्रँडेड रियर कॅमेरा आहेत, ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी LYT-900 एक इंचाचा सेन्सर, दुसरी 14 मिमी फोकल लेन्थ आणि 116-डिग्री FoV सह 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 85mm फोकल लेन्थसह 200 मेगापिक्सलची 1/1.14-इंच HP9 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे. Vivo X100 Ultra मध्ये कंपनीचा V3 इमेजिंग चिपसेट देखील आहे. हा HDR डॉल्बी व्हिजन इनेबल्ड सह 120fps वर 4K व्हिडीओ आणि 60fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. तसेच फ्रंटला 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80W वायर्ड आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo X100 Ultra टू-वे सॅटेलाइट कम्युनिकेशन सह देखील येतो, त्यामुळे नेटवर्क नसलेल्या ठिकाणी देखील इमर्जन्सी कॉन्टॅक्ट करता येईल. यात एक्स-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर, स्टूडियो-ग्रेड मायक्रोफोन, स्टीरियो डबल स्पिकर आणि खूप काही आहे. स्मार्टफोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून बचाव करण्यासाठी IP69 आणि IP68 रेटिंग आहे, जी स्मार्टफोनमधील सर्वात चांगली रेटिंग म्हणता येईल. हीट डिसिपेशनसाठी स्मार्टफोनमध्ये एक 3D VC कूलिंग सिस्टम आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.