Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google ची ‘ही’ सेवा होणार आता कायमची बंद

11

गुगलची एक सेवा आता कायमची बंद होणार आहे. कंपनीने सुमारे चार वर्षांपूर्वी ही सेवा सुरू केली. आम्ही Google One VPN सेवा 20 जून 2024 पासून काम करणे बंद करेल. ती ऑक्टोबर 2020 मध्ये सादर करण्यात आली होती. मात्र, गुगलने आधीच ही सेवा बंद करणार असल्याचे सांगितले होते. आता कंपनीने त्याची तारीख जाहीर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, “20 जून 2024 पासून, Google One VPN सेवा बंद केली जाईल,” असे Google ने त्याच्या सपोर्ट पेजवर म्हटले आहे. याशिवाय युजर त्यांच्या डिव्हाइसवरून Google One VPN सर्व्हिस कशी काढू शकतात हे देखील Google ने स्पष्ट केले आहे.

आता पिक्सेल युजर्स अशा सर्व्हिस वापरू शकतील

Google म्हणते की, पिक्सेल 8 आणि नवीन डिव्हाईस त्यांच्या सिस्टम सेटिंग्जचा भाग म्हणून इनबिल्ट VPN प्रोव्हाईड करतात. Google One ॲपवरून VPN सर्व्हिस काढून टाकल्यानंतर, Pixel 7 युजर्स त्यांचे सिस्टम सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतरही VPN सिस्टम वापरणे सुरू ठेवू शकतील. कंपनी 3 जून 2024 रोजी Pixel 7, 7 Pro, 7a आणि Fold साठी Google द्वारे इनबिल्ट VPN ॲक्टिव्ह करण्यासाठी सिस्टम अपडेट जारी करेल.

काय आहे VPN

VPN (उर्फ व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) तुम्हाला तुमची इंटरनेट ट्रॅफिक एन्क्रिप्ट करून सुरक्षितपणे वेब ब्राउझ करण्यात मदत करते. जेंव्हा तुम्ही वेबसाइटला भेट देता तेव्हा, तुमच्या डिव्हाइसवरून त्या साइटवर डेटा पाठवला जातो. परंतु सर्वप्रथम ते तुम्ही इंटरनेट वापरण्यासाठी वापरत असलेल्या वाय-फाय राउटरमधून जाते आणि तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या माध्यमातून जाते. VPN तुमचे डिव्हाइस आणि VPN सर्व्हर दरम्यान एक कनेक्शन तयार करून तुमचा नेटवर्क डेटा लपवतात, जेणेकरून तुमचा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा तुमचे डिव्हाइस आणि VPN सर्व्हरमधील इतर काहीही तुम्ही कोणती ॲप्स ब्राउझ करत आहात हे पाहू शकत नाही

तुमचे ब्राउझिंग सुरक्षित ठेवण्यास देखील मदत

VPN तुमचा IP पत्ता लपवून तुमचे ब्राउझिंग सुरक्षित ठेवण्यास देखील मदत करते. वेबसाइट्स आणि जाहिरातदार तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाइट्स आणि तुम्हाला आवडत असलेल्या कन्टेन्टचा फॉलो अप घेण्यासाठी तुमचा IP ऍड्रेस वापरतात. VPN तुमचा पर्सनल IP ऍड्रेस VPN सर्व्हरने नियुक्त केलेल्या नवीन IP पत्त्याने बदलतात, वेबसाइट्सची तुमचा फॉलो अप घेण्याची क्षमता काढून टाकतात.

भारतीय युजर्सवर काय होणार परिणाम

भारतातील गुगल युजर्सना या संदर्भात कुठलीही काळजी करण्याचे कारण नाही कारण कंपनीने भारतात
VPN सर्व्हिस सुरु केली नव्हती.

तुमच्या डिव्हाइसवरून Google One VPN सेवा कशी काढायची याची स्टेप बाय स्टेप माहिती देत आहोत.

  • फाइंडर उघडा.
  • साइडबारमधील Apps वर क्लिक करा.
  • VPN by Google One ट्रॅशमध्ये ड्रॅग करा.
  • आता “VPN by Google One” वर राइट-क्लिक करा.
  • आता Move to Trash निवडा.

तुम्हाला युजर नाव आणि पासवर्ड विचारला गेल्यास, तुमच्या Mac वर प्रशासक खात्याची क्रेडेन्शियल्स एंटर करा. तुम्ही तुमच्या Mac मध्ये लॉग इन करण्यासाठी वापरता ते नाव आणि पासवर्ड हे असू शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.