Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

corona in maharashtra: दिलासा! राज्यात आज करोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट; ‘अशी’ आहे ताजी स्थिती!

14

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ६९६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ०६२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही थोडी कमी झाली आहे. तसेच मृतांच्या सख्येतही घट झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्या किंचित घट आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ६९६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार १०५ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार १६४ इतकी होती. तर, आज ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ५० इतकी होती. (maharashtra registered 2696 new cases in a day with 3062 patients recovered and 49 deaths today)

आज राज्यात झालेल्या ४९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७७ हजार ९५४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने निधन

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या घसरतेय

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजार ९५५ इतकी आहे. काल ही संख्या ३६ हजार ३७१ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार ०९६ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार १५८ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ७६९ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या १ हजार ९६९ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ४१५ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ९१२ आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘सर्व आरोप खोटे’; कथित ऑडिओक्लिप प्रकरणी रामदास कदम कोर्टात जाणार

मुंबईत उपचार घेत आहेत ५,५८६ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ५८६ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६६८ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७१६, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८९८ इतकी खाली आली आहे.

गोंदियात १ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४५२, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १०१ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ११० वर आली आहे. तर गोंदियात राज्यात सर्वात कमी १ सक्रिय रुग्ण आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईकरांकडून पैसे उकळणाऱ्या क्लीनअप मार्शलांवर होणार कठोर कारवाई

२,४७,००६ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९० लाख ७४ हजार ६६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ५६ हजार ६५७ (११.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४७ हजार ००६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ३७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.