Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला…

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

बहुचर्चित प्रसिध्द व्यापारी अरून वोरा यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना स्थानीक गुन्हे शाखा, यांचे पथकाने ०५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन, ०२ देशी पिस्टल व ईतर साहीत्य असा एकुण ३,५०,०००/-रूपयांचा मुद्देमाल केला जप्त….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१३) रोजी अकोला शहरातील प्रसिध्द व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा हे त्यांचे रायलीजीन येथील दुकाण बंद करूण त्याचे घरी जात असतांना अनोळखी ०२ ते ०३ ईसमांनी त्यांना जबरदस्ती
पांढऱ्या कारमध्ये कोंबुन त्यांचे अपरहण केले याबाबत पो.स्टे रामदास पेठ अकोला येथे अप नं २०० / २४ कलम ३६५,३४ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता

सदर गुन्हयाचे गांर्भीय पाहता अपहृत अरुणकुमार वोरा यांचा शोध तसेच त्यांचे अपहरण करणारे अनोळखी आरोपी यांना निष्पन्न करणे बाबत पोलिस अधीक्षक यांनी स्थानीक गुन्हे शाखा चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके  यांना सदर गुन्हा उघडकीस आणने बाबत आदेशीत केले असता स्थानीक गुन्हे शाखा त्यानुसार ०२ पथके गठीत करण्यात आली . गोपनिय बातमीदार, तांत्रिक विश्लेषन व्दारे दिनांक १५/५/२४ रोजी गुप्त बातमीदारामार्फेत माहीती मिळाली की आरोपी नामे १) मिथुन उर्फ मोंटी सुधाकर इंगळे रा. जुना आळशी प्लाट चे बाजुला चिवचिव बाजार अकोला २) किशोर पुंजाजी दाभाडे रा. ग्राम कळंबेश्वर ता+जि. अकोला ३) फिरोज खान
युसूफ खान रा. जुना आळशी प्लाट चे बाजुला अकोला ४) शरद पुंजाजी दाभाडे रा. ग्राम कळंबेश्वर ता + जि. अकोला ५) अशिष अरविंद घनबाहादुर रा. बोरगाव मंजु ६) राजा सरफराज खान रा. कान्हेरी सरप ७) चंदु इंगळे रा. खदान अकोला ८) चंदूचा मित्र नाव माहीती नाही असे यांनी अरून कुमार वोरा यांचे अपहरण केले बाबत माहीती प्राप्त झाल्या वरून, नमुद आरोपींचे पत्यावर जावून त्यांचा शोध घेतला असता, मिळूण आले नाही. काही वेळातच
माहीती मिळाली की, अपहृत अरुणकुमार वोरा हे त्यांचे घरी परत आलेले आहेत. अपहृत अरुणकुमार वोरा याचे घरी जावून त्यांना विचापूस केली असता त्या ठिकाणी त्यांचे कडून माहीती मिळाली की, त्यांना कान्हेरी सरफ येथे एका घरात कोंडून ठेवले होते, अपहरण करणा-या आरोपीनेच त्यांना धमकी देवून अॅटो मधे बसवून अकोला कडे पाठविले बाबत माहीती प्राप्त झाली आणि गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त माहीती मध्ये सुध्दा कान्हेरी येथील आरोपी असल्याबाबत माहीती मिळाल्याने वर नमुद आरोपीनी संगणमत करून अरुणकुमार वोरा यांचे अपहरण केल्याबाबत संशय वाढल्याने आरोपींचा पुन्हा शोध घेवून तांत्रिक माहीतीच्या आधारे यातील आरोपी क्रमांक ०१ ते ०५ यांना रात्री उशीरा ताब्यात घेवून सदर गुन्हया बाबत विचापूस केली असता त्यांनी सर्वानी कट रचुन गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच त्यांनी गुन्हयात वापरलेले वाहन, हत्यार अग्निशस्त्र (०२ देशी बनावटीचे पिस्टल), व ईतर साहीत्य काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले. सदर आरोपींना पैश्यांची गरज असल्याने त्यांनी ०१ करोड़ खंडणी साठी अरुणकुमार वोरा यांचे कट रचून अपहरण केले होते. परंतु अपहरण करतांना अरुणकुमार वोरा यांचा मोबाईल घटनास्थळावरच पडल्यामुळे अरूण वोरा यांचे घरी आरोपींना सपंर्क साधता आला नाही. दि. १५/०५/२०२४ चे ११.४० वा. चे सुमारास आरोपी व अरुणकुमार वोरा हे कान्हेरी सरप येथे हजर असतांना आरोपीना  पोलिस मागावर असल्याची खात्री झाल्याने त्यांनी अपहृत
अरुणकुमार वोरा यांना ॲटो ने घरी पाठविले होते. ज्या अॅटोने अरुण वोरा घरी आले त्या अॅटोचालकाला स्था.गु.शा. अंमलदार यांनी ताब्यात घेवुन गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपी यांना वेगवेगळया ठिकाणावरून सकाळी ०५ वाजेपर्यंत ताब्यात घेवुन त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेले ०२ देशी पिस्टल, वाहन, मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
यातील १. आरोपी नामे मिथुन उर्फ मोंटी सुधाकर इंगळे २. आरोपी किशोर पुंजाजी दाभाडे ३. आरोपी फिरोज खान युसूफ खान ४. आरोपी शरद पुंजाजी दाभाडे ५. आरोपी अशिष अरविंद घनबाहादुर या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याचे दिसुन आले असुन त्यांचेवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असुन सदर घटनेत भा.दं.वि. कलम ३६४ (अ), तसेच आर्म अॅक्ट कलम ३, २५ प्रमाणे कलम वाढ करण्यात येत आहे.
जिल्हयातील जनतेस व व्यापारी संघटनेस पोलिस अधीक्षक यांचे तर्फे आवाहान करण्यात येत आहे कि, खंडणीच्या संबधाने कोणीही मागणी केल्यास अथवा त्रास दिल्यास पोलिस अधीक्षक  तसेच
पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अकोला मो. न. ९९२१०३८१११ यांना संपर्क साधावा.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक बच्चन सिंह,, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागिय पोलीिस अधिकारी  सतीष कुलकर्णी,पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थागुशासअकोला, पोलिस निरीक्षक मनोज बहुरे पो.स्टे रामदास पेठ यांचे मार्गदर्शनात, पोउपनि गोपाल जाधव स्थागुशा. पो. अमंलदार गणेश पांडे, फिरोज खान, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, गोकुल चव्हाण खुशाल नेमाडे, विशाल मोरे, भास्कर धोत्रे, सुलतान पठाण, उमेश पराये, प्रमोद डोईफोडे, वसीमोद्दीन शेख, एजाज
अहेमद,, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे, स्वप्नील खेडकर, अन्सार अहेमद, राहुल गायकवाड, स्वप्निल चौधरी, उदय शुक्ला, भिमराव दिपके, अशोक सोनोने, सतिष पवार, चालक पो.हवा प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, अनिल राठोड तसेच सायबर चे आशिष
आमले, गोपाल ठोंबरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.