Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गेमिंग फोनसाठी 70-80 हजार मोजण्याची गरज नाही; पुढील आठवड्यात येतोय Infinix GT 20 Pro

10

Infinix GT 20 Pro स्‍मार्टफोन 21 मेला भारतात लाँच केला जाईल. फोन लाँचसाठी काही दिवस शिल्लक आहेत आणि ब्रँडनं याची प्राइस रेंज व हार्डवेयर डिटेल्‍सचा खुलासा केला आहे. हे कन्‍फर्म झालं आहे की नवीन इनफ‍िनिक्‍स फोन Flipkartच्या माध्यमातून विकला जाईल. Infinix GT 20 Pro सर्वप्रथम गेल्या महिन्यात सौदि अरेबियात लाँच करण्यात आला होता. हा फोन 12GB रॅमसह येतो आणि मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 8200 अल्टीमेट प्रोसेसरसह आला आहे. फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा एक गेमिंग सेंट्रिक डिवाइस आहे, ज्यात डेडिकेटेड X5 टर्बो गेमिंग चिप देण्यात आली आहे.

Infinix GT 20 Pro ची किंमत

एक प्रेस रिलीज मध्ये कंपनीनं सांगितलं आहे की Infinix GT 20 Pro ची भारतात किंमत 25 हजार रुपयांच्या आत असेल. या प्राइस सेगमेंटमध्ये हा फोन OnePlus Nord CE 4, Realme Narzo 70 Pro 5G आणि Samsung Galaxy M55 5G सारख्या डिवाइसना टक्कर देईल. Infinix GT 20 Pro 21 मेला Infinix GT Book लॅपटॉपसह सादर केला जाईल. Flipkart वर याचं एक वेबपेज देखील बनवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये LED इंटरफेससह ‘सायबर मेचा’ डिजाइन देण्यात आली आहे.

साऊदी अरेबियात झाला होता लाँच

साऊदी अरेबियात लाँच करण्यात आलेल्या Infinix GT 20 Pro ची किंमत SAR 1,299 (जवळपास 28,800 रुपये) आहे. हा अँड्रॉइड 14 आधारित XOS 14 वर चालतो. फोनमध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी प्‍लस (1,080×2,436 पिक्‍सल्‍स) AMOLED डिस्‍प्‍ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz हर्ट्झ आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर देण्यात आला आहे आणि डेडिकेटेड X5 टर्बो गेमिंग चिप देखील आहे.

भारतात येत असलेल्या Infinix GT 20 Pro मध्ये 8 जीबी आणि 12 जीबी LPDDR5X रॅम दिली जाईल. तसेच हा फोन 256GB पर्यंत स्टोरेजसह सादर केला जाईल. GT 20 Pro मध्ये 108 मेगापिक्‍सलचा मेन कॅमेरा आहे. तर फ्रंटला 32 एमपीचा सेल्फी शुटर आहे. फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी आहे, जी 45 वॉट फास्‍ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.